टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी कांद्याची आवक कमी आहे. दरवर्षी 700 ते 800 गाड्या कांद्याची आवक होत असते. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी कांदा खराब होत असल्यामुळे आवक कमी होत आहे.
आवक कमी आहे पण कांद्याचे दर या वेळेस चांगले आहे. कांद्याच्या दरासंदर्भात अधिक माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी बोलताना दिली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज जवळपास 285 कांद्याच्या गाड्यांची आवक झाली आहे. कमीत कमी दोन हजार रुपये ते साडे पाच हजार रुपये दर सरासरी कांद्याला मिळत आहे. तर चांगल्या कांद्याला सहा ते साडेसहा हजार रुपये दर मिळत आहे.
मागील महिन्यात जवळपास 520 गाड्या कांद्याची आवक झाली होती. जवळपास पाच ते साडेपाच हजार रुपये भाव मिळत होता. मात्र कांद्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्त झाल्याने बाजारात कांद्याच्या दरात हजार ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
तर आज सोलापुरात सोमवारी 285 गाड्या कांद्याचे आवक झाली असून चांगल्या कांद्याला सहा ते साडेसहा हजार रुपये दर मिळत आहे आणि सरासरी कांद्याला पाच ते साडेपाच हजार रुपये दर मिळत आहे.
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या ठिकाणी कांदा बाजारात नसल्याने या ठिकाणी कांद्याला भरपूर मागणी आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोलापूर, धाराशिव, बीड, आणि इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून कांदा बाजार समितीत येत आहे. तर येत्या दोन महिन्यात पुणे, अहिल्या नगर, नाशिक या जिल्ह्यातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा येण्यास सुरुवात होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज