मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
होटगी रोड विमानतळावरून आता विमानसेवेचा आणखी एक विस्तार झाला आहे. गोवा आणि मुंबईनंतर आता सोलापूर थेट हैदराबाद शी जोडले जाणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रवासासाठी गुरुवारपासून तिकीट बुकिंगला सुरुवात झाली असून, १७ एप्रिल रोजी पहिले विमान आकाशात झेपावेल.

हैदराबादसाठी अंदाजे तीन हजार रुपये तिकीट राहणार असून वेळेबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली नाही, पण सायंकाळी विमानसेवा राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूरहून फ्लाय ९१ कंपनीकडून सुरवातीस गोवा, त्यानंतर स्टार एअर इंडिया कंपनीकडून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू केली.

सोलापूर ते बंगळुरू, सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे.

पण, नाईट लॅंडिंगची व्यवस्था नसल्याने दोन्ही शहरासाठी विमानसेवा सुरू करण्यास कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर फ्लाय ९१ कंपनीकडून सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. २ एप्रिल रोजी तिकीट बुकिंगला सुरवात आणि १७ एप्रिलला हैदराबादसाठी पहिले विमान झेपावणार आहे.

गोवा-सोलापूर १७ एप्रिलपासून सहा दिवस
गोवा-सोलापूर विमानसेवा आठवड्यातून चार दिवस होती, आता ती सहा दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमानसेवा १७ एप्रिलपासून सुरू होणार असून, वाढ केलेल्या दोन दिवसांसाठीची तिकीट बुकिंग आज २ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

तिरुपती विमानसेवेची प्रतिक्षाच
सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार कंपनीकडे सर्व्हेही करण्यात आला. पण कंपनीने पुणे ते तिरूपती व्हाया सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे विमानतळावर स्लॉट नसल्याने तिरुपतीची विमानसेवा लांबणीवर पडली आहे. सोलापूर विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्याने मुहूर्त लांबणीवर पडला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















