मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शिक्षक पात्रता परीक्षा तीन वर्षांनंतर १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी १२ हजार ९९२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
टीईटी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रावर देखरेख केली जाणार आहे.
यात परीक्षा केंद्रात जाताना प्रत्येक उमेदवाराचे फेस रीडिंग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्टर असे उपाय करण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे.
परीक्षार्थ्यांना नाव, ओळखीचा पुरावा अनिवार्य केला आहे. प्रवेशासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र यांपैकी एखादे मूळ ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे.
नावात बदल असलेल्या परीक्षार्थ्यांच्या राजपत्र अधिसूचना विवाहनोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पेपर दोनसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र, स्वतंत्र बैठक क्रमांक असणार आहे.
दिव्यांग परीक्षार्थ्यांना दिव्यांगत्वाचा लाभ घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. या परीक्षेमुळे अनेकांच्या शिक्षक होण्याच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत.
सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिकची मदत
■ परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून जिल्हा प्रशासन व प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिकचा आधार घेतला जाणार आहे. पोलिस आयुक्त यांची टीईटी परीक्षा समितीच्या सदस्यपदी नियुक्त्ती केली आहे. त्यामुळे या परीक्षेवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
परीक्षा पारदर्शक करण्याच्या दृष्टीने उपाययोजना
परीक्षा सुरळीत व नियोजनबद्ध पार पाडावी यासाठी झोनल अधिकारी व केंद्रप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षा अधिकाधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही. -कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज