मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील दहावी परीक्षे दरम्यान तोतया विद्यार्थी परीक्षेला बसविल्याप्रकरणी एकूण २० विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल असून त्यापैकी केवळ १० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.
उर्वरीत दहा विद्यार्थी, प्रशालेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक अद्यापही मोकाट असून हा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

दरम्यान तपासाधिकाऱ्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी व सक्षम अधिकारी नेमून या घटनेचा पुर्ण तपास करावा अशी मागणी मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

या घटनेची हकीकत अशी, दि. २० फेब्रुवारी रोजी नंदेश्वर येथील दहावी परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक यांनी मुलांचे तिकीट हॉल तपासताना दहा विद्यार्थी बोगस अर्थात तोतया असल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर केंद्र संचालकाच्या फिर्यादीवरुन मंगळवेढा पोलीसात गुन्हे दाखल झाले होते.

त्याचबरोबर मुळ दहा विदयार्थी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले होते. तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केवळ तोतया दहा विद्यार्थ्यास अटक केली. ते सध्या जामीनवर मुक्त झाले आहेत.

उर्वरीत दहा विद्यार्थी एक महिन्याचा कालावधी लोटत आला असतानाही त्यांना अटक करण्याची तपासाधिकाऱ्यांनी तसदी घेतली नाही. लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इन्टरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक यांनाही या घटनेत अटक होवूनही अपेक्षित असताना अद्यापही त्यांना अटक नाही.
माध्यमिकचे ८ ते १० वर्ग येथे उपलब्ध नसतानाही सांगली जिल्ह्यातील बोगस विद्यार्थी बसवून धुळफेक केली आहे. दहावीचे एकूण ५३ विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती मिळत असून त्यापैकी दहा विदयार्थीच सापडले, उर्वरीत विदयार्थ्यांचा तपास होणेही तितकेच गरजेचे आहे.

हे बोगस विद्यार्थी सांगली येथील आर. के. पंचीयन स्पोर्टस अॅकॅडमीची विद्यार्थी असल्याची माहिती स्पष्ट होत आहे. या अॅकॅडमीची संस्थापक भिमराव कोडगिरे आहेत.
प्रशालेचे मुख्याध्यापक जुंदळे असल्याची खात्रीशीर माहिती आहे. परीक्षेला बसलेले सर्व विदयार्थी सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत.
सदर संस्थेचे सोलापूर जिल्हयात अन्य चार ठिकाणी वर्ग चालू आहेत. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. तपासिक अंमलदार यांनी घटनेच्या मुळाशी जावून तपास करुन या बोगस संस्थेचा कारभार चव्हाट्यावर आणणे गरजेचे असताना त्यांनी हातमिळवणी करुन खोलवर तपास केला नसल्याचा आरोप गोवे यांनी केला आहे.
त्यामुळे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गांभीर्यपुर्वक यात लक्ष घालून दुधाचे दूध व पाण्याचे पाणी करावे अशी मागणी आहे. तपास व्यवस्थित न झाल्यास महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे शिक्षणमंत्री दादासो भुसे, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, गटशिक्षणाधिकारी शहा आदींना देण्यात आल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









