टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भिमा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच पोलिसांनी छापा टाकून वाळूसह एक टेंपो असा एकूण 4 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात टेंपो चालक व मालक यांच्याविरूध्द वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची हकिकत अशी,माचणूर येथील भिमा नदीपात्रातून दि.13 रोजी रात्री 12.00 वा. एका टेंपोत बेकायदा वाळू उपसा करून काही लोक भरत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी
बोराळे बीटचे पोलिस हवालदार महेश कोळी यांना सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे फर्मान काढले असता कोळी यांनी त्या ठिकाणी जावून बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली असता
एम एच 12,एफ ए.5457 या टेंपोत हौदयामध्ये 4 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू भरल्याचे तसेच कॅबीनमध्ये व्हिवो कंपनीचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांना मिळून आला.
दरम्यान पोलिसांनी वाळू, मोबाईल व टेंपो असा एकूण 4 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना पाहताच टेंपो चालक व वाळू भरणारे लोक अंधाराचा फायदा घेवून गायब झाले.
पोलिसांनी सदर परिसरात त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत. टेंपो ताब्यात घेवून तो पोलिस स्टेशन आवारात आणून लावण्यात आला आहे.
याची फिर्याद पोलिस शिपाई वैभव घायाळ यांनी दिल्यावर अज्ञात टेंपोचालक व मालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, भिमा नदीत सध्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मोठया प्रमाणात रात्रीच्यावेळी वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे.महसूल खात्याने वाळू चोरी रोखण्यासाठी तलाठयांची पथके करणे गरजेचे असताना अदयापही त्यांनी न केल्यामुळे वाळू तस्करांना वाळू चोरीत वाढ होत आहे.
प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी या कामी लक्ष घालून शासनाच्या मालमत्तेची होणारी चोरी पथके कार्यरत करून रोखावीत अशी सुज्ञ नागरिकांतून मागणी होत आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसात दोन वाहनावर कारवाई करून वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
वाळूमध्ये कमी कष्टात मोठया आकडयात पैसा मिळत असल्याने काही लोक या व्यवसायात उतरून रात्रभर हा व्यवसाय पोलिसांचा डोळा चूकवून वाहनाने बांधकामावर वाळू पोहोच करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज