mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 10, 2022
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
मोठी बातमी! मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आपला पती आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्या प्रियकराला सोबत घेत पतीचा खून करणाऱ्या महिलेला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेनं त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी आपल्या प्रियकराची मदत घेत पतीवर खुनी हल्ला केला. त्यात पती ठार झाल्यावर तिने बनाव रचला आणि पतीने आत्महत्या केली, असं दाखवलं. मात्र अखेर तिचं बिंग फुटलंच. या घटनेने तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली

या प्रकरणात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील शिवनगी येथील सत्यवान मच्छिंद्र कांबळे उमदी येथील खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता.

यांच्या पत्नीचे सांगली येथील प्रशांत अशोक पवार (वय 32 जुना मिरज कुपवाड रोड सांगली) याच्याबरोबर अनैतिक संबंध होते.

त्या संबंधातून मयताच्या पत्नीच्या सांगण्यावरून शाहरुख रफिक शेख (वय 24 पालवी हॉटेल जवळ सध्या रा.गारपिर चौक सांगली) अजय परशुराम घाडगे वय 24 रा. समडोळी ता. मिरज यानी काल रात्री 1.30 वा शिक्षक सत्यवान कांबळे त्याच्या घरी झोपलेला असताना त्याचा  दोरीने गळा आवळून खून केला

व याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्याच्याच घरातील पंख्याला दोरीला अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला.

दरम्यान त्याच्या पत्नीने पहाटे उठून पाहिले असता आपला पती दिसला नाही व त्याने गळफास घेतल्याचे दिसून आल्याचे सांगितले.

सांगलीच्या गुन्हे अन्वेषण पथक एका दुहेरी खुनाच्या अनुषंगाने माहिती काढीत असताना यातील तीन संशयित आरोपी हे सांगली ते मिरज रोड वर तानंग फाटा येथे संशयित रित्या फिरत असताना आढळून आले.

त्यांनी उमदी परिसरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याच्या माहीत वरून पोलिसांनी सापळा लावून या तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने केलेल्या खुनाची माहिती यावेळी पोलिसांना दिली.

दरम्यान त्याच्या पत्नीने पहाटे उठून पाहिले असता आपला पती दिसला नाही व त्याने गळफास घेतल्याचे दिसून आल्याचे सांगितले होते.

शिक्षक सत्यवान कांबळे त्याच्या घरी झोपलेला असताना त्याचा जागी दोरीने गळा आवळून खून केला व याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्याच्याच घरातील पंख्याला

दोरीला अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्याची पत्नी इंदिरा कांबळे व तिच्या प्रियकरासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

सहज चौकशी केली अन् खुनाला वाचा फुटली

■ रात्री खून केल्यानंतर प्रशांत व त्याचे दोन मित्र सांगलीकडे पळून गेले. बुधवारी दुपारी सांगलीच्या तानंग फाट्यावर हे तिघे थांबले. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला या तिघांची हालचाल संशयास्पद वाटली. त्याने सहज चौकशी केली असता हे तिघे गडबडले. बहुदा आपला गुन्हा पोलिसांना समजला असावा, असे वाटून प्रशांतचा मित्र अजय घाबरुन गेला. समोरच्या पोलिसाला सारे माहित झाले असावे, या समजुतीतून त्याने घडाघडा सत्य कथन केले.

■ घटनेचे गांभीर्य ओळखून बाकीची टीमही तत्काळ फाट्यावर आली. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या पथकातील सपोनि प्रशांत निशाणदार , दिलीप ढेरे, संदीप पाटील , संतोष गळवे, संकेत मगदुम, संदीप गुरव, राजू शिरोळकर, सचिन धोत्रे, सागर ढिंगरे , अरुण औताडे , राजू मुळे, मच्छिद्र बडे , सुरेखा कुंभार यांनी कसून चौकशी केली. या तिघांनी खुनाची कबुली देताच सांगली पोलिसांनी तत्काळ मंगळवेढा पोलिसांर्शी संपर्क साधला.

■ दरम्यान, काल रात्री सत्यवानचा मृतदेह पोस्टमा ग्रामीण रुग्णालयात आणला होता. सत्यवानचा मृत्यू आत्महत्येतून नसून, पत्नीनेच प्रियकराकरवी खून केला आहे, हे समजताच नातेवाईकांसह अख्खा गाव हादरला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खून

संबंधित बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
Next Post
दबंग कामगिरी! मंगळवेढ्यातील ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, दरोड्याच्या तयारीत आलेले सराईत गुन्हेगार जेरबंद; १० तोळे सोने केले जप्त

दबंग कामगिरी! मंगळवेढ्यातील ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, दरोड्याच्या तयारीत आलेले सराईत गुन्हेगार जेरबंद; १० तोळे सोने केले जप्त

ताज्या बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा