मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
बेंगलोर (रा. कर्नाटक) येथील चिंतामणी या गावी आयशर टेम्पो क्र. एम.एच.४५/ए.एक्स. ४६४७या गाडीतून जनावरे भरून ती विक्री करण्याकरीता घेऊन जात असताना,

मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी फाटा या ठिकाणी निळ्या रंगाची टाटा झेस्ट फोर व्हीलर गाडी क्र. एम.एच. ०४/एच.एफ. ९८४३ या गाडीतून आलेल्या

सागर अशोक भोरकडे (२३), अविनाश कृष्णा भोरकडे (२३), अर्जुन राजु ऊर्फ शेट्याप्पा माने (२०), तुकाराम कल्लाप्पा रुपटक्के (२१),

बिरुदेव देविदास शिकतोडे (सर्व रा. हुलजंती, ता. मंगळवेढा), दयानंद भिमाशंकर बजंत्री (वय २२, रा. करजगी, ता.जत, जि. सांगली) यांनी

चालक गणेश भिमाशंकर कुंभार (वय ३५), महेश भारत कोळपे आणि केतन बबन जगदाळे यांना हाताने लाथाबुक्क्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील रोख रक्कम तीन हजार रुपये काढून घेऊन ५ हजार रूपये ऑनलाईन घेतल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी गणेश भीमाशंकर कुंभार (वय ३५, चालक, रा. वेळापूर, ता. माळशिरस) हे दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ०९.३० ते दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२.१५ वा. चे सुमारास सोड्डी फाटा, हुलजंती येथून त्यांचे मित्र मित्र महेश भारत कोळपे आणी निखील पिसे याचा कामगार

केतन बबन जगदाळे असे निखील पिसे याची जनावरे घेऊन भाड्याने केलेल्या आयशर टेम्पो क्र. एम.एच. ४५/ए.एक्स. ४६४७ मध्ये भरुन ती विक्री करणेकरीता बेंगलोर (रा. कर्नाटक) येथील चिंतामणी या गावी घेऊन जात असताना,
सोड्डी फाटा येथे निळ्या रंगाच्या टाटा झेस्ट फोर व्हीलर गाडी क्र. एम.एच. ०४/एच.एफ. ९८४३ यामधून आलेल्या वरील सहा संशयित आरोपींनी त्यांची कार टेम्पोच्या आडवी लावून,
आमची गाडी थांबवून फिर्यादी व सोबत आलेल्या महेश भारत कोळपे आणि केतन बबन जगदाळे यांना हाताने लाथाबुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने माझ्या खिशातील रोख रक्कम ३ हजार रुपये काढून घेतले.
तसेच त्यांचेकडील यु.पी. आय. स्कॅनवर ५ हजार रूपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले म्हणून वरील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून

पोलिसांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केले असून त्यांना शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










