मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ते डोणज मार्गावर मंगळवेढा पोलीस कोंबींग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीसांना एक संशयास्पद स्कार्पीओ गाडी बेकायदेशीरपणे

शस्त्रे घेवून जाताना मिळून आली असून या प्रकरणी गणेश मारुती कचरे, रामभाऊ शहाजी पाटोळे (रा. मेंढापूर ता. पंढरपूर), शिवदास उत्तम सोनवले (रा. साखरी जि. धुळे) या तिघा विरुध्द शस्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील फिर्यादी पोलीस नाईक ईश्वर दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, पोलीस हेडकॉनस्टेबल श्रीमंत पवार, चालक पोलीस हवालदार चौधरी आदी शासकीय वाहनाने पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,

अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय.एस.पी. डॉ. बसवराज शिवपुजे, पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने कोंम्बींग ऑपरेशन व नाका बंदी यासाठी पोलीस ठाणे हद्दीत फरारी आरोपी व संशयीत इसम तपासणी कामी

मरवडे ते डोणज मार्गावर दि. १५ रोजी १ वाजता जात असताना चौधरी वस्ती जवळ एक समोरुन येणारी चार चाकी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ वाहन दिसल्याने त्यचा संशय आल्यावर पोलीसांनी हात करुन थांबविले.
सदर वाहनातील व्यक्तीची कसून चौकशी केली असता प्रथमतः त्याने उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने पोलीसांचा संशय बळावला व वाहनाची कसून तपासणी केल्यानंतर

त्यामध्ये एक लोखंडी तलवार, एम. एच.४५ ए.९५०१ या गाडीत मिळून आली. पोलीसांनी सदर इसमांना ताब्यात घेवून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या गाडीसह मुद्देमाल जप्त केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










