टीम मंगळवेढा टाईम्स ।
अत्याधुनिक आणि प्रगती बँकिंग सुविधा असलेली सुर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सांगोला या बँकेच्या मंगळवेढा शाखेचा आज सोमवार दि.21 एप्रिल रोजी लोकपर्ण सोहळा होणार असून दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तीर्थप्रासादास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली आहे.
मंगळवेढा येथील काझी बिल्डिंग जाधव जलधारा समोर सुर्योदय अर्बन बँकेचा उद्घाटन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन पुजा मोहन इंगवले, व्हा.मंगल लवटे, संचालक ज्योती जगन्नाथ भगत, मीनाक्षी सुभाष दिघे यांनी दिली आहे.
याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील सर्व बँकांचे चेअरमन, पदाधिकारी, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रशासकीय विभाग आदीजन मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सोने तारण कर्ज घ्या प्रत्येक दिवशी
सुर्योदय अर्बन बँकेने खास नागरिकांच्या सोयीसाठी रविवार असो किंवा कुठलीही सुट्टी सोनेतारण कर्ज प्रत्येक दिवशी मिळणार असल्याचे जाहीर केले असून प्रति तोळा 80 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
100 दिवसाच्या ठेवींवर 10 टक्के व्याजदर
सुर्योदय अर्बन बँकेने शुभारंभ ठेव योजनेअंतर्गत 100 दिवसाच्या ठेवींवर 10 टक्के व्याजदर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
अत्यंत अल्पदरात लॉकर सेवा उपलब्ध
सुर्योदय अर्बन बँकेच्या सभासदांना खातेदारांना अत्यंत अल्प दरात लॉकर सेवा बँकेने उपलब्ध करून दिली आहे.
सरकारी नोकरदार कर्ज योजना
सुर्योदय अर्बन बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे नोकरदार तसेच रिटायर पेन्शन धारक यांच्यासाठी खास कर्ज योजना बँकेने सुरू केली आहे.
12 टक्के वार्षिक व्याजदर
दरम्यान सुर्योदय अर्बन येथे वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.
दाम चौपट ठेव योजना
आकर्षक लाभ देणाऱ्या विश्वसनीय योजना सुर्योदय अर्बन बँकेने सुरू केल्या आहेत. यामध्ये सुर्योदय अर्बन दाम चौपट ठेव योजना, सुर्योदय अर्बन दाम तिप्पट ठेव योजना, सुर्योदय अर्बन दाम दीडपट ठेव योजना व सुर्योदय अर्बन दाम दुप्पट ठेव योजना नागरिकांना फायदेशीर आशा चार योजना सुरू केल्या आहेत.
0.5 टक्के व्याजदर जादा
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 24 महिन्याच्या पुढे 13 टक्के व्याजदर राहील.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज, पिग्मी कर्ज, मासिक ठेव योजना, सुर्योदय अर्बन कन्यादान ठेव योजना, सुर्योदय अर्बन पेन्शन योजना व शेतकऱ्यांसाठी खास सुर्योदय अर्बन मध्ये दुधाचे पेमेंट जमा करा व त्यावर कर्ज मिळवा अशी योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, बचत खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, बचत खात्यावर ५ % वार्षिक व्याज, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● महिला बचतगट योजना व कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायं ६,
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज