टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या मुलींच्या अपहरणाचे प्रमाण जास्त वाढले असून त्यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांना दोन हेल्पलाइन नंबरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या तपासणीच्या निमित्ताने त्या मंगळवेढा दौऱ्यावर होत्या. तपासणीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी उपस्थित होते.
अधीक्षक सातपुते म्हणाल्या की, कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा व महाविद्यालय सुरू होत आहेत त्यामुळे मुलींची छेडछाड,अपहरण या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे.
त्यासाठी मंगळवेढ्यातील रिक्त जागी चांगल्या कार्यक्षम अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करून त्यांना शहर व ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालय भेटी देऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
त्यामुळे मुलींची छेडछाड अपहरण,बालविवाह,मुलीचे करियर घडवण्याच्या संदर्भात समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधेचा लाभ होणार आहे.
सध्या मंगळवेढा व सांगोला या दोन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा निर्गतीकरणाचे प्रमाण अतिशय समाधानकारक असून अवैध व्यवसायातील तरुणांचे इतर व्यवसायात परावर्तन करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तन व ग्रामसुरक्षा पथकाद्वारे चोरी,
अपहरण गुन्ह्यातील आरोपी अटकेसाठी राबवलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगून येथील उपविभागीय कार्यालयाच्या रखडलेल्या कामाबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातली असून निधी उपलब्ध होताच लवकरच या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातून होत असलेली जड वाहतूक तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस स्टेशनचे दूरध्वनी बंद असल्यामुळे असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण कंट्रोल रूम मधून,
प्रत्येक पोलिस स्टेशनच्या लँडलाईन दूरध्वनीवर फोन करून तो सुरू की बंद आहे याची खातरजमा दररोज केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या अडचणीचे निराकरण फोनवरून करता येणे शक्य झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज