mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सर्व गावांना पाणी मिळाल्याशिवाय शिखर समिती स्थापन करू नये : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 11, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील बंद भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील समाविष्ट सर्व गावांना पाणी मिळाल्याशिवाय शिखर समिती स्थापन करू नये अशी मागणी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी प्रसिध्दीपत्रकानव्ये केली आहे.

पंचायत समितीच्या सभागृहात शिखर समिती स्थापन करण्यावरून खडाजंगी झाली.रात्री उपसभापती सुरेश ढोणे यांनी बैठक घेण्याचा प्रयत्न केला. पंचायत समितीच्या राजकारणात खळबळ उडाली त्यावर अध्यक्ष आवताडे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले.

त्यात म्हटले आहे की सध्या योजना अर्धवट अवस्थेमध्ये असून या योजनेपासून लेंडवेचिंचाळे, शिरसी, सलगर बु., खवे,शिवणगी,आसबेवाडी या गावांना पाणी पोहोचले नाही तरीही संबंधित गावांना पाण्याचा लाभ न मिळता पाणीपट्टी आकारणी केली.

या योजनेतील समाविष्ट गावांची एकूण पाणीपट्टी रुपये 42 लाख 82 हजार 168 इतकी आकारली. तर वीज बिल 64 लाख रुपये भरावयाचे आहे.जवळपास बावीस लाखाची तफावत असून याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची.

दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेच्या सुरुवातीच्या एक वर्ष ट्रायल बेसवर कसल्याही प्रकारची पाणीपट्टी आकारली जाणार नाही असे सरपंच ग्रामसेवक व जनतेस सांगितले तसेच 2019- 20 या कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधी ही गाव भेट दौऱ्यामध्ये टंचाई परिस्थिती असल्याने पाणीपट्टी आकारली जाणार नाही असे सांगितल्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीतील पाणीपट्टी काही ग्रामपंचायतीने वाढीव दराने आकारणी केली नाही.

वाढीव पाणीपट्टी संबंधित गावातील जनता ग्रामपंचायतीकडे भरण्यास तयार नाही. उचेठाण जॅकवेल लाईट बिल रुपये 59 लाख सहा हजार 739 व जुनोनी जलशुद्धीकरण केंद्र रुपये पाच लाख 36 हजार 40 अशी एकूण रुपये 64 लाख 42 हजार 771 थकित आहे.

ही योजना गेल्या नऊ महिन्यापासून बंद आहे त्याच बरोबर बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त आहे सध्या कोरोना मारामारीचे संकट असून जनतेच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत सदरची योजना अशा अवस्थेत असताना शिखर समिती स्थापन करून योजना ताब्यात घेणे कितपत योग्य आहे.

शिखर समिती स्थापन करून योजना चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे आणि हा आर्थिक भार शिखर समितीला पेलवणार नाही त्यामुळे जिल्हा परिषदेने टंचाई मधून रुपये 18 लाखाची तरतूद करून ठेकेदाराला पुढील तीन महिन्यासाठी चालविण्याचे आदेश दिले.

त्यामुळे पुढील तीन महिन्यापर्यंत शिखर समिती स्थापन करण्याचा विचार करण्यात येऊ नये यापूर्वी आंधळगाव नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घेतल्या नाहीत व अद्याप शिखर समिती स्थापन केली नाही तर अर्धवट अवस्थेत असणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना घाईगडबडीने शिखर समिती स्थापन करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न अध्यक्ष आवताडेनी उपस्थित केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भोसे पाणी पुरवठा योजनासमाधान आवताडे

संबंधित बातम्या

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

November 28, 2025
आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
Next Post
काय सांगता! स्मार्टफोनची स्क्रीन व नोटांवर कोरोनाचा विषाणू ‘एवढे’ दिवस जिवंत राहू शकतो

बापरे! मंगळवेढा तालुक्यात बुधवारी तीन कोरोनाचे रुग्ण सापडले

ताज्या बातम्या

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

November 28, 2025
आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..