टीम मंगळवेढा टाईम्स ।
अभ्यासाच्या तणावातून तसेच पेपर अवघड जाणार असल्याच्या चिंतेतून इयत्ता दहावीतील १६ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
ही घटना लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथे ता. ११ रोजी घडली. ऋतुजा युवराज बाबर (रा. लक्ष्मीनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
फिर्यादी साधना नाथा साठे यांची बहीण पौर्णिमा युवराज बाबर या आपली दोन मुले ओम व साई, मुलगी ऋतुजा यांच्यासह लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास आहेत. ऋतुजा ही लक्ष्मीनगर येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती.
दरम्यान, लवकरच दहावीची परीक्षा सुरू होणार असल्याने ऋतुजा अभ्यासाच्या तणावात होती. ऋतुजाने मावशी साधना यांना फोनवरून दहावी परीक्षा जवळ आली आहे,
मला पेपर अवघड जाणार असल्याची चिंता व्यक्त केली होती. यातूनच टोकाचा निर्णय घेत ऋतुजाने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ऋतुजाची आई पौर्णिमा व आजी या दोघी कडलास येथे कामाला गेल्या होत्या. त्यांना ऋतुजाने गळफास घेतला असल्याचे समजताच पौर्णिमा यांनी बहीण साधना यांना फोन करून ऋतुजाला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले.
ऋतुजाला उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
ऋतुजाचे दोन्ही भाऊ घराबाहेर खेळायला गेले होती. काहीवेळाने दोघेही जेवणासाठी घरी आले. त्यावेळी दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी फोन करून हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी साधना नाथा साठे यांनी सांगोला पोलिसांनी माहिती दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज