मंगळवेढा टाईम्स न्युज।
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनत केल्याशिवाय उचित ध्येय प्राप्त होणार नाही. ध्येय प्राप्तीसाठी दैनंदिन अभ्यासाचे योग्य नियोजन अन् सातत्य राखून मेहनतीच्या बळावर गुणवत्ता संपादन करावी. असे मत आयपीएस अधिकारी बिरुदेव डोणे यांनी केले आहे.

मंगळवेढा येथील उद्योजक सुनील पाटील यांच्या निवासस्थानी IPS बिरुदेव डोणे यांनी आज भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी उद्योजक प्रभाकर घुले, वित्त लेखा अधिकारी अजित शिंदे, जयदीप रत्नपारखी, सतीश पाटील, दिलीप पाटील सर, प्रशांत यादव, पत्रकार समाधान फुगारे, विलास मासाळ, प्रमोद बिनवडे आदीजन उपस्थित होते.

2024 मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळाचा मुलगा बिरुदेव डोणे याने अवघ्या 27 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 551 रँकने उत्तीर्ण झाला होता.

आयपीएस बिरुदेव डोणे पुढे बोलताना म्हणाले की,
माणसाची परिस्थिती कधीच शिक्षणाच्या आड येत नाही. मीसुध्दा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिक्षण घेता घेता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होतो.

या स्पर्धा परीक्षा देताना मला अपयशदेखील आले; तरीही मी जिद्द सोडली नाही. पुन्हा नव्या जोमाने व नव्या उमेदीने प्रयत्न केल्याने आज मी आयपीएस होऊ शकलो.
परिस्थिती कधीच यशाच्या आड येत नसते. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी ठेवा आपण ग्रामीण असल्याचा न्यूनगंड काढून टाका .आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हुशार मुलांसाठी अनेक दालने खुली आहेत, असेही ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









