मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यात बारावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच इंग्रजीच्या पेपरला सांगोल्याच्या केंद्रावर कोल्हापुरातील क्लासेसची मुलं परीक्षेला बसल्याची माहिती शिक्षण विभागापर्यंत पोहोचविण्यात आली होती.
या गोपनीय माहितीच्या आधारे माध्यामिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी त्या केंद्राला अचानक भेट देऊन तीन कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून रीतसर कारवाई केली.
सोलापूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कॉपीसारखा प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
भरारी पथके, बैठी पथके, केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात येत आहे. अशाही परिस्थितीत सांगोल्यातील एका केंद्रावर कॉपी होत असल्याची गोपनीय माहिती शिक्षण विभागाला मिळाली. त्यानंतर शिक्षणाधिकारी सचिन जगताप केंद्रावर पोहोचले अन् खासगी क्लासेस अन् केंद्रामध्ये संगनमताने सुरू असलेला प्रकार हाणून पाडला.
अन् केंद्रावर पोलिस बंदोबस्त वाढविला
• शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केलेल्या कारवाईनंतर केंद्रावर काही वेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी जास्तीचा पोलिस बंदोबस्त मागवीत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्राध्यक्षांना जगताप यांनी चांगलेच झापले.(स्रोत:लोकमत)
परीक्षा केंद्रावर वॉच
बारावी परीक्षा सुरळीत अन् कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली बैठे, भरारी पथके कार्यरत आहे.
शिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर वॉच ठेवत आहोत. सांगोल्यात तीन कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. – सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यामिक, जिल्हा परिषद
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज