टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रविवारी सोलापूर व औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. शहरातील छावणी परिसरात शहर स्वच्छता जनजागृती मोहिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहे.
त्यानंतर ते सोलापूरसाठी शासकीय विमानाने रवाना होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. तर यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त देखील असणार आहे.
असा असणार दौरा…
आज 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई येथून शासकीय विमानाने (VT-VDD) चिकलठाणा, औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.
सकाळी 10.45 वाजता चिकलठाणा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने छावणी परिषद मैदान, औरंगाबादकडे प्रयाण.
सकाळी 11 वाजता डॉ.श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने छावणी परिषद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शहर स्वच्छता जनजागृती मोहिमेत उपस्थित राहतील.
दुपारी 12 वाजता छावणी परिषद मैदान, औरंगाबाद येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 12.15 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने (VT-VDD) सोलापूर विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 01:00 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने शेवगांव-भाळवणी, ता. करमाळा सोलापूर विमानतळाकडे प्रयाण
दुपारी 01:30 वाजता आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि.शेदगांव-भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर हेलिपॅड येथे आगमन
दुपारी 01:30 वाजता आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि.शेदगांव-भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर हेलिपॅड येथे आगमन
दुपारी 01:30 वाजता आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेदगांव-भाळवणी, ता. करमाळा या कारखान्याचा 27 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ
दुपारी 02:30 वाजता शेगांव-भाळवणी, ता. करमाळा येथून हॅलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण
दुपारी 02:45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने (VT-VDD) नागपूरकडे प्रयाण
दुपारी 03:45 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने रामगिरी निवासस्थान, नागपूरकडे प्रयाण
दुपारी 04:00 वाजता रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे आगमन व राखीव
एकनाथ शिंदे यांचा आजच्या दौऱ्यात फक्त स्वच्छता जनजागृती मोहिमेचं एकमेव कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात एकही राजकीय कार्यक्रम नसणार आहे. मात्र यावेळी काही राजकीय भेटीगाठी होऊ शकतात. तर औरंगाबाद दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे सोलापूरला रवाना होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज