टीम मंगळवेढा टाईम्स।
सांधे अक्षरशः कडक झाले होते. असह्य वेदनांनी ‘ती’ तळमळत होती. मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या अन् एक – दोन नाही , तर तब्बल १० वर्षांनंतर ‘ती’ स्वतःच्या पायावर नीटपणे वेदनारहित उभी राहू शकली.
संधिवाताने १० वर्षे ही महिला त्रस्त होती. त्यापैकी काही वर्षे तर ती अक्षरश:अंथरुणाला खिळून होती. तिचं वय ६५ वर्षे आहे. जिजाबाई गायकवाड असे त्या महिलेचे नाव आहे.
संधीवातामुळे त्यांचा गुडघ्याची कार्यक्षमता कमी झाली होती. अखेर उपचारांसाठी मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
जिजाबाई गायकवाड यांचे दैनंदिन जीवन-मान विसकळीत झाले होते. त्यांनी अनेक दवाखान्यात उपचार करून पाहिले मात्र त्यांना गुडघ्याच्या आजारापासून मुक्तता मिळत नव्हती.
गुडघ्या या आजारामुळे त्यांना प्रचंड वेदना व उभे राहता येत नव्हते, चालता येत नव्हते.
मंगळवेढा येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले अन् त्यांना एक जीवनदान मिळाले.
डॉ.प्रवीण सारडा व त्यांच्या टीमने तातडीने सर्व तपासण्या करून त्यांनी गुडघे प्रत्यारोपण यशस्वी शस्त्रक्रिया केली व पेशंट अवघ्या काही दिवसातच उठून सरळ चालू लागला.
ही किमिया डॉ.प्रवीण सारडा व त्यांच्या टीमने केल्यामुळे तालुकाभर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जिजाबाई गायकवाड यांना जीवदान व कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाल्यामुळे त्यांनी डॉ.प्रवीण सारडा यांचे आभार मानले.
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज