टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केल्यामुळे विरोधकांची झाली बोलती बंद होणार असून आमदार समाधान आवताडे यांनी बोलल्या प्रमाणे करून दाखवले असल्यामुळे आता खऱ्या अर्थाने दुष्काळी भागात दिवाळी साजरी होईल.
आत्तापर्यंतची परिस्थिती बदलणारा हा ऐतिहासिक क्षण देखील आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची सुरवात कालपासून सुरू झाली असून लवकरच जनतेला पाणी मिळणार आहे.
त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांची ताकद देखील आता वाढली असून उर्वरित असलेली कामे देखील पूर्णत्वास येत आहेत.
शेतकऱ्यांना रस्ते संदर्भात मोठ्या अडचणी येत होत्या, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर केल्या असल्याचे सांगितले.
रस्ते, वीज शेतकऱ्यांना कधी कमी पडू देणार नाही. आमच्या सरकारने सर्व शेतकऱ्यांना वीज बिल माफ केली. मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील 48 हजार शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली आहेत.
24 गाव उपसा सिंचन योजना खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाला वरदायिनी ठरणार आहे. येणाऱ्या पिढी आपल्या सरकारचे हे काम कधीच विसरणार नाहीत. मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो येणाऱ्या काळात शेती मध्ये अग्रगण्य तालुका म्हणून उदयास येईल.
शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या काळात सर्व पीक घेईल. येथील सर्व आपले ऋण कधीच विसरणार नाही. भीमा नदीमध्ये बंधारा झाल्याने तामदर्डी भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. शेतकऱ्यांना भरभरून पाणी मिळवण्यासाठी अजून 15 कोटी आपण मंजूर करून द्यावे अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली.
भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना खूप निकृष्ठ दर्जेचे काम झाले असून ही योजना एमजीपी कडे हस्तांतरित करावी अशी मागणी देखील केली.
3 हजार कोटी पेक्षा जास्त निधी
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असून खोटे नाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत. 3 हजार कोटी पेक्षा जास्त निधी या मतदारसंघात आलेला आहे हे जनतेला सुद्धा माहिती आहे व प्रत्यक्षात कामही सुरू आहेत, त्यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे असा हल्लाबोल आमदार आवताडे यांनी केला.
24 गावांना पाणी आणून दाखवील हे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले; देवा भाऊ बोलता हे ओ करता है
तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकत दिली, तुमचे आशीर्वाद होते म्हणून सर्व योजना मार्गी लागल्या, आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा या मतदारसंघाला नंबर वन केल्या शिवाय राहणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी माजी रणजितसिंह निंबाळकर, आ.सुभाष देशमुख, आ.राजेंद्र राऊत, आ.विजयकुमार देशमुख, आ.संजय मामा शिंदे, आ.शहाजी बापू पाटील, माजी आ.प्रशांत परिचारक, आ.बबनदादा शिंदे,आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.राम सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. ज्यांच्यामुळे ही योजना पूर्ण होत आहे ते म्हणजे पाणीदार आमदार समाधान आवताडे होऊ,
तुमची ताकत आवताडे यांच्या पाठीशी द्या आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या काळात या मतदारसंघात मोठे परिवर्तन घडवू असे फडणवीस म्हणाले.
समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मी आलो होतो त्यावेळेस शब्द दिला होता. आवताडे यांना निवडून द्या मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो असे सांगितले व 24 गावांना पाणी आणून दाखवील हे आश्वासन दिले होते, देवा भाऊ बोलता हे ओ करता है असे म्हणत शब्द खरा करून दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार यांची मदत घेऊन सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी संपून टाकत आहोत. ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणत होते आता त्याच तालुक्यात पाणी आणून दिले जात आहे.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमुळे 17 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून प्रत्येक शेतकऱ्यांना शेतीत पाणी मिळणार आहे. येणाऱ्या काळात सर्व गावे पाणीदार होतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांचे शेती वीजबिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना एक ही रुपया भरायचा नाही. शेतीला दिवसा वीजपुरवठा देण्यात आला आहे.
येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना सोलरच्या माध्यमातून निर्माण होणार याचा निर्णय घेतला.
मागेल त्याला सौर कृषी पंप शेतकऱ्यांना केवळ एका अर्जावर 10 टक्के रक्कम भरून देण्यात येणार आहे, 90 टक्के पैसे आमचे सरकार भरणार आहे.
हे सरकार शेतकऱ्यांचे असून एक रुपयांत पीकविमा आणला आहे. महिलांना देखील लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर महिला प्रवास करत आहेत. सर्वात महत्त्वाची योजना मुलींना मोफत शिक्षण सुरू केले आशा अनेक योजना सुरू केल्या आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज