टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका ३२ वर्षीय महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी त्यानी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश के . डी . शिरभाते यांच्यासमोर झाली असता न्यायालयाने देशमुखला आज १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
तसेच देशमुखला १६ तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जामीन अर्जास सरकारी पक्षाकडून व फिर्यादीच्या वकिलांकडून विरोध दर्शवत आरोपी देशमुख हा राजकीय पार्श्वभूमीचा असून, त्याला जामीन मिळाल्यास तो पळून जाण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे तपासाकामी अडचणी येऊ शकतात तसेच पीडितेचे वकील अॅड . महेश जगताप व अॅड . विद्यावंत पांढरे यांनी दाखल प्रतिज्ञापत्र करून पीडितेला वारंवार केस मागे घेण्यासाठी धमक्या येत असून , फिर्यादीच्या जीवाला असल्याचे सांगितले.
धोका या बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीला १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
यात सरकारतर्फे अॅड . प्रदीपसिंह रजपूत यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे विद्यावंत पांढरे यांनी व आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. आशिष गायकवाड , अॅड . बाबासाहेब जाधव ॲड . विनोद सूर्यवंशी , अॅड . अभिजीत इटकर , अॅड . निशांत लोंढे यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज