टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य शासनानं महिलांसाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी, मंगळवेढा येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत विशेष ‘मदत कक्ष’ सुरू करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
या योजनेंतर्गत ज्या लाभार्थीना कुठल्याही अडचणी किंवा समस्या आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंगळवेढा तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्याद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात,
मंगळवेढा तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरिता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत तहसील प्रशासनाकडून करण्यात आले.
स्वावलंबीकरण, करण्याबरोबरच आत्मनिर्भर महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरिता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरिता महिलांनी तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजना, हेल्पलाइन झाली सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी बँक खात्यावर अद्याप पैसे जमा नाहीत, बँकेत जमा झालेले पैसे कपात असतील,
योजनेत येणाऱ्या कोणत्याही त्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता श्रीमती अनुराधा शिंदे 9423591049 किव्हा आर वाय विजापुरे 9326527044 या नंबर वर आपण सपंर्क करू शकता.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज