टीम मंगळवेढा टाईम्स।
न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून पतीने हात पकडला आणि सासूने ब्लेडने तिच्या हातावर मारून जखमी केले. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून सासूसह पतीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
याप्रकरणी स्नेहा गिरीधर टंकसाळ (वय २४, रा. तुळशांतीनगर, विडी घरकूल, सोलापूर) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनसार सासू सरस्वती रामचंद्र टंकसाळ व पती गिरीधर रामचंद्र टंकसाळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी स्नेहा ही सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कार्यक्रमाला गेली होती. यावरून स्नेहा यांच्या सासूने शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर स्नेहाला तिचा पती गिरीधर याच्यासमोर उभे करून विचारणा केली. पतीनेही ‘तु मला न सांगता कुठे गेली होतीस व घर सोडून बाहेर का गेलीस’ असे म्हणत मारहाण केली.
पतीने स्नेहाचा हात पकडला, सासूने घरात असलेली दाढीची ब्लेड तिच्या डाव्या हातावर, मनगटावर मारून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकाराबद्दल एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन स्नेहाने पती व सासूविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज