टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 236 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर 309 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे.आज सात पुरुष व तीन महिलांसह 10 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
आज 1 हजार 518 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 282 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 236 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 26 हजार 536 एवढी झाली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या ही 725 झाली आहे.
कोरोनामुळे बाधित झालेल्या 5 हजार 131 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 20 हजार 680 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आज ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू
मोहोळ तालुक्यातील विरवडे येथील 60 वर्षाची महिला, पांगरी (ता. बार्शी) येथील 70 वर्षाचे पुरुष, आढीव (ता. पंढरपूर) येथील 52 वर्षांचे पुरुष, तुळजापूर रोड बार्शी येथील 45 वर्षाचे पुरुष, वागदरी (ता.अक्कलकोट) येथील 81 वर्षाचे पुरुष,
तर करमाळा तालुक्यातील माळवाडी येथील 60 वर्षाचे पुरुष, उक्कडगाव (ता. बार्शी) येथील 55 वर्षाची महिला, भीमनगर अक्कलकोट येथील 51 वर्षाची महिला, बार्शी येथील 70 वर्षाचे पुरुष, पिलीव रोड माळशिरस येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
In the rural areas of Solapur today, 309 people are corona free and 236 new corona free
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज