टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा अध्यादेश निघाल्यानंतर सोलापूर जिल्हा तिसऱ्या टप्प्यात येत असून शनिवार व रविवार वगळता सर्व दुकाने उद्या सोमवारपासून दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
अन्य निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज याबाबत आदेश जारी केला असून उद्या सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून तो लागू होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात अत्यावश्यक दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत दररोज सुरु राहतील तर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. विवाहासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी असणार आहे.
रेस्टॉरंट संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, त्यानंतर घरपोच सेवा देण्यास अनुमती आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदानं, वॉकिंग, सायकलिंगसाठी दरदिवशी पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत तर पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्ससाठी परवानगी देण्यात आली आहे.
संसर्गदर, ऑक्सिजन बेड यावर राज्यात पाच स्तर करण्यात आले असून त्यानुसार अनलॉक प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा हा तिसऱ्या स्तरात असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे यासाठी १५ दिवसांची वैधता आहे. अशा अहवालाशिवाय दुकान, व्यवसाय सुरु करता येणार नाही. असे जिल्हाधिकारी यांच्या काढलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज