टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 125 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आज सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 201 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज 2 हजार 737 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 612 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 32 हजार 209 एवढी झाली आहे. त्याचबरोबर 958 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाग्रस्त झाल्याने अद्यापही एक हजार 721 जण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. 29 हजार 530 जण कोरोनामुक्त झाल्याने सुखरूप घरी पोहोचले आहेत
आज ‘या’ गावातील रुग्णांचा मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील 32 वर्षाचे पुरुष व जिती येथील 64 वर्षाचे पुरुष,पालवन (ता. माढा) येथे 62 वर्षाची महिला, महूद (ता. सांगोला) येथील 58 वर्षांचे पुरुष, तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला, सांगोला येथील 75 वर्षाचे पुरुष तर अजनसोंड (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या व कंसात मृत्यू संख्या
मंगळवेढा- 1453 (40), मोहोळ- 1617 (83), उत्तर सोलापूर- 740 (36), पंढरपूर- 6440 (193), सांगोला- 2503 (42), दक्षिण सोलापूर- 1445 (49),अक्कलकोट- 1146 (67), बार्शी- 5852 (178), करमाळा- 2054 (48), माढा- 3337 (109) माळशिरस- 5616 (113) एकूण = 32 हजार 209 (958)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज