मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिग ठाकूर यांना निवड श्रेणी मिळाली असून, त्यांना पदोन्नतीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

तर निवडणूक उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांना अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. त्यांची नियुक्ती सोलापुरातच करण्यात आली आहे.

ठाकूर या दोन वर्षापूर्वी सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्या जिल्हाधिकारी संवर्गातील
निवडश्रेणीसाठी पात्र झाल्या असून त्यांची बदली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.

शासनाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यामध्ये सोलापूरला पुर्नवसन उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या स्नेहल भोसले याही पात्र ठरल्या आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














