टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि श्रध्देचा बाजार मांडणाऱ्या मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याचा पर्दाफाश झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
कारण एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करत तिच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये कथित महाराज मनोहर भोसले याच्यासह त्याचे साथीदार नाथ बाबा उर्फ विशाल वाघमारे आणि वैभव वाघ या तिघांवर भादवि कलम 376, 385,506 तसेच जादुटोणा विरोधी प्रतिबंधक कायदा 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केल्यानंतर तो करमाळा पोलीसांकडे वर्ग करण्यात आलाय.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मनोहर मामा हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी तीन पथकं रवाना झाली होती. अखेर त्याला अटक करण्यात यश आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज