टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील मुक्ताई मतिमंद बालक आश्रमातील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.
त्या संबंधित मुलांना शुक्रवारी पहाटे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव हे शासकीय रूग्णालयात दाखल झाले असून बाधित मुलांची विचारपूस करीत आहेत.
41 मुले ठणठणीत
आश्रम शाळे मधील मुलांना अचानकपणे ताप येऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्व मुलांची कोरोना चाचणी केली त्यामध्ये 41 मुले पॉझिटिव्ह आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले असून आता सर्व मुले ठणठणीत असल्याची माहिती आश्रम चालक शिवाजी जाधव यांनी दिली.
आश्रम शाळेतील सर्व कर्मचारी निगेटिव्ह
आश्रम शाळे मधील 48 मुलांपैकी 41 मुले पॉझिटिव्ह आढळल्याने शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.
पालकमंत्री भरणे यांची हॉस्पिटल भेट देऊन विचारपूस केली
मंगळवेढ्यातील मुक्ताई मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेत ४१ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे या सर्व मुलांवर उपचार चालू आहेत. आज पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, उपचारांची माहिती घेतली व डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज