मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा तालुक्यातील जालीहाळ येथील सोलनकरवाडीत घरासमोरील जनावरांना व घरातील पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून शेतातील मोटार सुरु करण्यास गेलेल्या
आकाश हणमंत सोलनकर (वय २१) या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना (दि..२६) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
आकाश हा गायींना पाणी द्यावे म्हणून मोटार पेटीजवळ गेला असता विजेचा प्रवाह उतरल्याने तो मोटार सुरू करण्यापूर्वीच विजेचा धक्का बसल्याने जागीच कोसळला.
बराच वेळ परत न आल्याने आई व भावाने पाहायला गेली असता तो बेशुद्धावस्थेत आढळला.
उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आकाशचे वडील दहा वर्षांपूर्वीच वारले असून भाऊ आजारी असल्याने तोच घरातील एकमेव आधार होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.
शासनाने नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून तातडीने सोलनकर कुटुंबास आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी सरपंच सचिन चौगुले यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज