टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर । राजेंद्र फुगारे
या वर्षी सितारामकडे गाळपास येणाऱ्या उसाला २५०० रुपये प्रति मेट्रिक टन पहिली उचल देणार आहे. अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे गाळपास आलेल्या उसाचे बिल मस्टरनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सिताराम साखर कारखानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड यांनी सांगीतले आहे.
काल सिताराम साखर कारखानाचा ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांचे शुभहस्ते व धनश्री परिवारचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे तसेच चेअरमन प्रा.शोभा काळुंगे यांच्या उपस्थितीत मोळी पूजन व तेरावा गाळप हंगाम शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड बोलत होत्या.
२०२३-२४ गाळप हंगामासाठी मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने दररोज साधारणपणे ३५०० मे. टन ऊसाचे गाळप होणार आहे. कारखान्यात आधुनिक डिस्टीलरी प्रकल्प उभा करण्याचे काम हाती घेतले आहे.
तो लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबरीने ग्रीन हायड्रोजन इंधन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यात येणार असून हा प्रकल्प उभा करण्यामध्ये भारतातला पहिला कारखाना राहणार आहे. मागील गाळप हंगामात कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसास २३०० रुपये प्रतिटन दर दिलेला असुन आणखी दिवाळी सणांसाठी १०० रुपये प्रति टन हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात येणार आहे. तसेच माफक दरात उस उत्पादकांना साखर वाटप करणार येणार आहे.
शासन निर्णयानुसार सिताराम कडील वजन काटे डिजिटल असुन शेतकऱ्यांनी आपला उस कोठेही वजन करुन घेवुन यावा त्यामध्ये कोणतीही तापवत पाहण्यास मिळणार नाही. कारखानदारीत दराच्या बरोबरीने चोख वजन काट्याची देखील स्पर्धा व्हायला हवी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, अनेक अडचणीतून हा कारखाना बाहेर काढला आहे. या हंगामासाठी मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने दररोज साधारणपणे ३५०० मे. टन ऊसाचे गाळप होणार आहे. या हंगामात ४ लाख मे. टन उस गाळप करण्याचे उद्दीष्ट आहे. शेतकरीवर्गाचे जगणे सुसह्य करण्यासाठी धनश्री व सिताराम परिवार झटत आहे.
शेतकरी, कामगार, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांच्या एकत्रित कामामधून येणारा सिझन हा नक्की यशस्वी होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ त्यांना मिळणार आहे. तरी सर्व भागातील उस पुरवठा शेतक-यांनी त्यांचा जास्तीत जास्त उस चालु वर्षी सिताराम साखर कारखान्याला गाळपास देवुन सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी ह.भ.प.अॅड.जयवंत बोधले महाराज, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, महादेव देठे, डॉ. रमेश सिद, प्रा. ज्ञानेश्र्वर जाधव यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी यादाप्पा माळी, संचालक सुयोग गायकवाड, स्नेहल मुदगल, दिपाली पाटील, प्रकाश काळुंगे, डॉ.रविराज गायकवाड, प्रगतशिल बागायतदार शिवाजी घोडके, दत्तात्रय सुर्यवंशी, सिमाताई काळुंगे, विठठलचे माजी संचालक उत्तम नाईकनवरे, बिभीषण ताड, अविनाश चव्हाण, कारखान्याचे कायदे सल्लागार शैलेश हावनाळे, संजय चौगुले,
धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे जनरल मॅनेजर रमेश फडतरे, चिफ इंजिनिअर एस. बी. रोंगे, प्रशासन अधिकारी डी. एम. सुतार, चिफ केमिस्ट व्ही. एस. नागणे, मुख्य शेती अधिकारी पी. जी. शिंदे, को – जन मॅनेजर ए. बी. गाजरे, सिव्हील इंजिनिअर आर. एस. वायदंडे,
पर्चेस व सेल्स मॅनेजर एन. पी. कोठावळे, पर्चेस ऑफीसर आर. एन. चेळेकर, स्टोअर किपर डी.जे. नागणे, ई.डी.पी. मॅनेजर टी.बी. पांढरे, फायनान्स अकौंटंट व्ही. एन. भोसले यांचेसह कारखान्यातील सर्व कर्मचारी, ऊस पुरवठा सभासद शेतकरी, तोडणी वहातुक कंत्राटदार व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जनरल मॅनेजर हणमंत पाटील यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज