टीम मंगळवेढा टाईम्स।
सिताराम महाराज साखर कारखाना लि. खर्डी या कारखान्याचा २०२२-२३ सिझन करीता १२ वा गळीत हंगाम मोळी पूजन समारंभ आज शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वा. कारखाना स्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रवर्तक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी दिली.
हा गळीत हंगाम शुभारंभ ह.भ.प. अॅड. जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते तर मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक संचालक समाधान काळे, सांगोला तालुका सहकारी सुत गिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, संत दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन तानाजी खरात, सदगुरु हजारे,
सिताराम महाराज साखर श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषगिरीराव, डॉ. बी. एस. मान, जन कल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र कारखान्याच्या चेअरमन प्रा. शोभा काळुंगे,
सांगोल्याचे उदयोजक सोमनाथ गुळमिरे यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी सिध्दनाथ जगदाळे, शिवाजी घोडके, दत्तात्रय सावंत, धुळा पाटील, चांगदेव पवार यांचेसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी पंढरपूर सांगोला-मंगळवेढा येथील ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, कर्मचारी खाते प्रमुख, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे
असे आवाहन सिताराम शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज