टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरालगत असलेल्या संत चोखामेळानगर ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक -२ मध्ये माने व कर्णेकर यांच्या मध्ये रोड संदर्भात
गेली १० वर्षे रखडलेला व न्यायालयीन असलेला वाद मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव आवताडे यांनी दोघांना सामज्यंसपणे समजावून सांगून मिटवला व सदरच्या रोडचे भूमिपूजनही केले.
सिद्धेश्वर आवताडे यांनी शेताच्या बांधावर जाऊन या रस्त्याचा वाद असणाऱ्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांमध्ये समेट घालवून हा वाद सोडविला,
त्यामुळे रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ सिद्धेश्वर आवताडे यांना धन्यवाद देतांना दिसत आहे.
तर वाद सामंजस्याने मिटवणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सिद्धेश्वर आवताडे यांनी गौरव करून नवा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.
यावेळी सोमनाथ कर्णेकर, अमोल कर्णेकर, जगदीश कर्णेकर, संतोष कर्णेकर, अमोल शिंदे, दिगंबर वस्ते,
सोमनाथ नकाते, विशाल जाधव, प्रमोद सावंजी, दादासाहेब बाबर , तात्या चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.
आदर्श इतर गावांनी ही घ्यावा
सर्व गावकऱ्यांनी असेच गटतट बाजूला ठेऊन विकासकामात सहकार्य केल्यास गावाची उन्नती होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे काम करण्यास हुरूप येईल.
आज जो प्रश्न समझोत्याने सुटला आहे त्याचा आदर्श इतर गावांनी ही घ्यावा. यामुळे विविध विकास कामे जोमाने होण्यास मदत होईल. – सिद्धेश्वर आवताडे, चेअरमन खरेदी-विक्री संघ.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज