मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रम शाळेत घडला आहे.
सनमडी येथे असणाऱ्या नामांकित आश्रम शाळेमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक देखील केली आहे.
विनोद जगधने असे या अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
18 एप्रिल रोजी सन्मडी मधल्या नामांकित आश्रम शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या विरोध जगधनेकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाकडून पीडित अल्पवयीन मुलीला हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
दरम्यान आश्रम शाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आश्रम शाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण देखील केली होती. यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता.
मात्र नामांकित आश्रम शाळा असल्याने सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली. आणि अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुख्याध्यापक विनोद जगधने याला अटक देखील करण्यात आली असून नरदन मुख्याध्यापकाकडून आणखी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला असून याबाबत तक्रार देण्याचं आवाहन उमदी पोलिसांच्याकडून करण्यात आला आहे. जतचे पोलीस निरीक्षक संदिप कांबळे यांनी यासंदर्भारत माहिती दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज