टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकांच्या हितासाठी सत्ता वापरायची असते पण याची जाणीव आज सत्ताधाऱ्यांना नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पंतप्रधान मोदींनी राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला नेल्याचे पवार म्हणाले.
याप्रसंगी यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, बाबासाहेब देशमुख, उत्तम जानकर, भूषणसिंह होळकर आदीजन उपस्थित आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज येथील जाहिरात सभेत शरद पवार बोलत होते.
सभेला 30 हजारापेक्षा जास्त जनसमुदाय
यावेळी 30 हजारापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता, अब की बार धैर्यशील भैय्याच खासदार नागरिकांच्या घोषणे लक्ष वेधले होते.
पंतप्रधानांना मूळ गोष्टी समजत नाही, नको ते बोलतात. आपण हळूहळू हुकूमशाहीकडे चाललो असल्याचे म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. काही झालं तरी चालेल पण हुकूमशाही आली न पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी लढलं पाहिजे असे पवार म्हणाले.
लोकशाही संस्था उद्धवस्थ करायच्या हीच मोदींची गॅरंटी असल्याचे शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांना मूळ गोष्टी समजत नाही, नको गोष्टी करतात असा टोलाही पवारांनी लगावला.
कोणताही नवीन प्रकल्प निघाला की तो गुजरातला जातो
मोदी सरकारच्या काळात कोणताही नवीन प्रकल्प निघाला की तो गुजरातला जातो. औ,धाची रायगडमध्ये होणारी कंपनी गुजरातला हलवली, पुण्यातील एक कंपनी गुजरातला हलवली. यांची नजर गेली की ओळखायचं आता हे हलणार असं म्हणत पवारांनी मोदींवर टीका केली.
देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना हे शोभत नसल्याचे पवार म्हणाले. सत्ताधारी राहुल गांधींवर टीका करतात, राहुल गांधींनी तुमचं काय घोड मारलंय असं देखील शरद पवार म्हणाले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका का होत नाहीत?
आज जिल्हा परिषदांच्या, पंचायत समितीच्या, ग्रामपंचाईतीच्या निवडणूका का होत नाहीत? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. लोकशाही संस्था उद्धवस्थ करायच्या ही मोदींची गॅरंटी असल्याचे शरद पवार म्हणाले.
मोदी सत्तेवर राहणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच जवाहरलाल नेहरु यांच्यावर देखील टीका केली जातेय. ते आज हयात नसताना त्यांच्यावर टीका कशासाठी करायची असा सवालही पवारांनी उपस्थित केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज