mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवारांचे दिवाळीनिमित्त आईला भावनिक पत्र; आठवणींना दिला उजाळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 15, 2020
in राज्य, राजकारण
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानी घेतली शरद पवारांची भेट, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर

महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. सामन्यांच्या प्रश्नांची नाडी माहीत असणारा जाणते व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणाशी जोडलेली नाळ, अशी त्यांची ओळख.

पवार यांचा राजकारणात कोणीही हात धरणे अशक्य आहे. इतकेच काय तर महाराष्ट्र  राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका आहे. पवार यांच्याबद्दल त्यांना ओळखणारे भरभरुन बोलू शकतात. मात्र, त्यांच्या मनात काय आहे, हे आजही कोणीही सांगू शकलेले नाही.

परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली.या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. शरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर आली आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, गहिवर आणते. तुमच्या प्रेरणेच्या बळावर नेहमी उभारी घेण्याचा निर्धार केला. कौटुंबिक जबाबदारी व सामाजिक बांधिलकी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काम करण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. pic.twitter.com/YlTFzc2c9u

— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 13, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळीनिमित्त आईला भावनिक पत्र लिहिले आहे. पत्रात आईची उणीव भासत असल्याची भावना पत्रातून व्यक्त केली आहे. पत्रात पवारांनी नेमकं काय म्हटले आहे, याची उत्सुकता आहे.

पत्रास सुरुवात करताना साष्टांग नमस्कार, म्हणत पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व! मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले, असे म्हटले आहे. त्यांनी अनेक गोष्टीवर आणि प्रसंगावर या पत्रात भाष्य केले. मात्र, आईला घातलेली साथ सर्व काही सांगून जाते.

शरद पवार यांनी आपल्या दिवंगत आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या आईचे आभार व्यक्त करत आपल्या मनातील खंत या पत्राद्वारे बोलून दाखवली आहे.

खचून जाण्याचा प्रश्चच नव्हता

लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आले नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे, काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यांतच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचे मोठे आव्हान उभं राहिले. पण तुम्ही मला हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचे बाळकडू दिले आहे. मग खचून जाण्याचा प्रश्चच नव्हता, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मला चांगले आठवत आहे. बैलाने मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला. पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सार्वजनिक कामात देखील झोकून दिले. या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला.

तरुणाईचा उत्साह मिळाला आणि…

हे करत असताना मला तरुणाईने डोक्यावर घेतले. मला नवा उत्साह मिळाला, मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपलं सरकार आलं. नवे सरकार जेव्हा शपथ घेत होते, तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होते, या आठवणीला पत्रातून त्यांनी उजाळा दिला.

आणि असे संस्कार माझ्यावर झाले !

राजकीय धामधुमी कमी झाली तसे कोरोना महामारीचं संकट ओढवले. त्यातून अद्याप दिलासा नाही पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय. बाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच १९३५ च्या पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात.

लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान्हं मूल कडेवर घेऊन, खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जात असत. कळत-नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो.

ही शिकवण तुमच्याकडूनच मिळाली..

राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली. माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे झालेल्या सत्कारप्रसंगी राष्ट्रपती, आजी-माजी प्रधानमंत्र्यांसहित भारतातील सर्वपक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित होते. हा अपूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराचे फलित आहे, असे मी मानतो. त्या सत्कारप्रसंगी तुमचीच मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती.

कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वत:च्या आवडी-निवडी नुसार निवडायचे स्वातंत्र्य आपण दिले. आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठावूक आहे. ‘आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण आहेत, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो’ हे तुम्ही कटाक्षाने पाहायचा.

आईबद्दल एक तक्रार

तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलेत, पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असे तुमचे स्वप्न होते. पण मी राज्याचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात. अप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हाही नव्हतात. भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले, त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, मनात गहिवर आणते.

दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते आहे. अधिक काही लिहित नाही. तुमचा शरद.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आईला पत्रशरद पवार

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नॉन स्ट्राईकला आयुष्याचा झाला The End; रन काढताना हार्ट अटॅक आला, Live मॅचमध्ये रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा मृत्यू

February 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टेन्शन मुक्त! दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षेचे टेन्शन; एका कॉलवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेता येणार; बोर्डाने केली तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

February 9, 2026
सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

February 6, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

भोसे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग; भैरवनाथ शुगरमध्ये आज विचारविनिमय बैठक, भोसे जिल्हा परिषद गटासह मंगळवेढा तालुक्याचे लक्ष

February 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! मंगळवेढ्यात महिलेस शेजारीच राहणाऱ्या पती-पत्नीने केली जबर मारहाण

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा