मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सध्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले काढले जात आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने पालक व विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत.
१२ जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता पालकांची लगबग सुरू झाली.
प्रवेशाकरिता जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलेअर, रहिवास दाखला आदी दाखल्यांची आवश्यकता असते. पालकांनी दाखले मिळण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज केले आहेत. शासनाच्या सर्व्हरवर अचानक लोड आल्यामुळे दाखले निघेनासे झाले आहेत. जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून दाखल्यांवर सह्या होत आहेत, मात्र त्याची प्रिंट निघत नाही.
एकीकडे शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये २६ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता १ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये आवश्यक दाखले मिळत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत, अशी तक्रार शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाकडे गेली होती.
शासनाने याची दखल घेतली असून, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग पुणे कार्यालयाला पत्र पाठवून सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सुटेल : शमा पवार
संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल्यांसाठी अर्ज येत आहेत, त्यामुळे अचानक सर्व्हरवर ताण आला आहे. दाखला निघण्यात अडचणी येत आहेत. मात्र, यावर सध्या काम सुरु आहे. मुंबई कार्यालयाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सुटेल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी बोलताना दिली.(स्त्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज