टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारवेस येथील बसवेश्वर कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत गंभीर दोष आढळल्याने खत, बियाणे व कीटकनाशक असे तीनही परवाने २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केली आहे.
कीटकनाशक, बियाणे व खत निरीक्षक तथा उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामचंद्र कांबळे यांनी केलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी तपासणी अहवालावर सुनावणी घेतली.
सुनावणीत मे. बसवेश्वर कृषी सेवा केंद्राचा खुलासा समाधानकारक आढळला नाही. बियाणे विक्री परवाना वेळेत नूतनीकरण केले नाही, बियाण्यासाठी रजिस्टर व विक्री रजिस्टर ठेवले नाही,
विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व बियाण्यांचे रेकॉर्ड ठेवले नाही, कीटकनाशक पुरवठा प्रमाणपत्र मंजूर नसताना विक्री करणे, मुदतबाह्य कृषी निविष्ठा विक्री केल्या, कृषी निविष्ठांचे वेळेत नूतनीकरण केले नसल्याचे आरोप निलंबन आदेशात करण्यात आले आहेत.
तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आलेल्या दत्तात्रय गवसाने यांच्या कालावधीत १० महिन्यांत खत दुकानावर पहिली कारवाई झाली आहे.
बोगस खतांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
सेंद्रिय शेती व इतर नावाने बनावट खते, बियाणे व कीटकनाशक शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. त्यातून शेतकऱ्यांचा पैसा वाया जातो
मात्र अपेक्षित उत्पादन हाती येत नाही. असे प्रकार खत विक्रेत्यांना हाताशी धरून केले जातात. खत दुकानदारांनाही यातून अधिक पैसा मिळतो. मात्र यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज