मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी गतिमान हालचाली सुरू आहेत.
भाजपचे माजी आ. प्रशांत परिचारक हे गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील जि.प. गटातील गावांना भेटी देऊन इच्छुकांच्या मुलाखती घेऊन मते जाणून घेत आहेत.

तर आ. समाधान आवताडे यांनी शुक्रवारी पंढरपुरातील इच्छुकांना मंगळवेढ्यात बोलावून चर्चा केली. त्यामुळे हे दोघे एकत्र लढणार की वेगवेगळे याविषयी चर्चा सुरू आहेत.

आजी-माजी आमदारांच्या संघर्षात नगरपालिकेतील सत्ता गेली, वास्तविक पाहता पंढरपूर शहरासह तालुक्यात माजी आ. प्रशांत परिचारक गट सक्षम आहे. मात्र, दोन वेळा विधानसभेला निवडून आलेल्या आ. समाधान आवताडेंना मानणारा वर्गही निर्माण झाला आहे.

आता जि.प., पंचायत समिती निवडणुकीतही नगर परिषद निवडणुकीप्रमाणे फटका बसत समर्थक कार्यकर्ते दुरावू नयेत याची खबरदारी आ. आवताडे हे घेताना दिसत आहेत.

त्यामुळेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील समाविष्ट कासेगाव, गोपाळपूर, टाकळी, वाखरी या चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांना मंगळवेढ्यात पाचारण करत त्यांची मते जाणून घेतली.

मागील निवडणुकीत स्वबळावर सात जि.प. व १४ पंचायत समिती गण जिंकत निर्विवाद सत्ता मिळवणारा परिचारक गट यावेळी त्याच ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुप्त बैठका घेणारे माजी आ. प्रशांत परिचारक हे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत.

आवताडे, परिचारक गटात पुन्हा संघर्ष रंगणार का?
आ. समाधान आवताडे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीतून माघार घेताना पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात हस्तक्षेप न करण्याचा शब्द परिचारकांनी घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

त्यामुळे आवताडेंची इच्छा असूनही आपल्या समर्थकांना न्याय देऊ शकत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांचा छुपा राजकीय संघर्ष आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











