बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर जागेची विक्री केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध सदर सोलापुरात बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील वसंत पोतदार, स्वप्निल सुनील पोतदार, निखिल सुनील पोतदार, तत्कालीन संबंधित तलाठी व मंडल अधिकारी ( दोघे रा. दक्षिण कसबा, जुनी फौजदार चावडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही घटना २९ मार्च १९९४ ते आज पर्यंत घडली. फिर्यादी अनिल आप्पासाहेब भोपळे ( वय ५१ रा. कावेरी सदन, मजरेवाडी ) यांच्या मालकीच्या जागेची आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. त्यानंतर सुनील पोतदार , स्वप्निल पोतदार व निखिल पोतदार यांनी त्यांची नावे वारस म्हणून लावून घेतली.
या मिळकतीतील काही हिस्स्याचा भाग सहदुय्यम निबंधक सोलापूर उत्तर -१ यांच्या कार्यालयात वेळोवेळी हजर राहून फिर्यादी अनिल भोपळे यांच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करून त्यांची फसवणूक केली. तसेच फिर्यादी भोपळे यांच्या मिळकतीवर अनधिकृतपणे तार कंपाउंड उभे केले.
याबाबत भोपळे यांनी विचारणा केली असता त्यांनाच शिवीगाळ, दमदाटी व ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक संजय जगताप हे तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज