टीम मंगळवेढा टाईम्स।
नव्याने सुरु असलेल्या घराच्या बांधकामांवर पाणी मारत असताना छोट्या विद्युत पंपाद्वारे पाण्यात उतरलेल्या विजेच्या धक्क्याने मरवडे येथील सचिन तात्यासो पवार (वय २८ ) या उच्चशिक्षित तरुणाचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण मरवडे गावांवर शोककळा पसरली आहे .
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, मरवडे-चडचण रस्त्यांलगत स्वतःच्या शेतीमध्ये नव्याने सुरु असलेल्या बांधकामांवर पाणी मारण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास धाकटा भाऊ इंजि. संकेत यांस सोबत घेऊन गेला होता.
यावेळी पाण्याच्या दाबाने पाईप निघाल्याने तो जोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच मोटार उंचावरुन खाली पाण्यात पडली. शिवाय विजेची केबल निसटून पाण्यात पडल्याने घराच्या छतावर विजेचा करंट पसरला.
विजेच्या जोरदार धक्क्याने त्याची होणारी अवस्था लक्षात येताच प्रसंगावधान राखून संकेतने विद्युत प्रवाह बंद केला. मात्र तोवर काळाने सचिनवर झडप घातली.
आपला बिझनेस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पोहोचवा.
आजच करा संपर्क : 9970 76 6262
परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन कुटूंबिय व नातलगांनी उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल केले. मात्र हा विजेचा धक्का तीव्र होता की उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर आज दोन वाजता त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
सचिन हा शांत ,संयमी व मनमिळावू म्हणून सर्वपरिचीत होता. तो उच्चशिक्षित होता शिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.
वडील तात्यासो पवार हे हॉटेल सह्याद्रीच्या माध्यमातून सर्वपरिचित असून धाकटा भाऊ संकेत हा बांधकाम व्यावसायिक म्हणून लौकिक मिळवित असून मरवडे येथे बिल्डिंग मटेरीयलचा मोठा व्यवसाय आहे.
या दोन्ही व्यवसायात तो अलिकडे वेळ देत होता. त्याच्या निधनामुळे पवार कुटूंबाला मोठा धक्का बसला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे .
गेल्या चार महिन्यात मरवडे गावात घडलेली ही तिसरी घटना असून गावात विजेच्या वापराची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज