टीम मंगळवेढा टाईम्स।
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अर्थात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क संदर्भात प्रवेशासाठी अर्ज भरण्यास शुक्रवार, १७ मे २०२४ पासून सुरुवात झाली आहे.
ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याची शेवटची मुदत ३१ मे २०२४ पर्यंत असणार आहे. दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग
बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के प्रवेश आरटीई कायद्यानुसार देण्यात येणार आहेत.
आरटीई कायद्यानुसार सोलापूर शहर-जिल्ह्यात २ हजार ५३१ प्रवेश देण्यात येणार आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) अनुसार
सोलापूर शहर-जिल्ह्यातील शाळात आरटीईनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. यात २९६ शाळात स्वयंअर्थसाहित, विनाअनुदानित, पोलीस कल्याणकारी विनाअनुदीत शाळा आणि महानगरपालिका स्वयं अर्थसहाय्यित शाळांचा समावेश आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज