mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मजबुतीकरण! मंगळवेढा व पंढरपुरातील विकास कामांसाठी ५ कोटी मंजूर; आ.आवताडे यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 29, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
मजबुतीकरण! मंगळवेढा व पंढरपुरातील विकास कामांसाठी ५ कोटी मंजूर; आ.आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू आहे.

यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि मतदारसंघातील रस्ते सुविधा सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ समाधान आवताडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग या विभागाकडे आ.समाधान आवताडे यांनी सदर निधीची मागणी केली होती.

सन २०२२-२३ या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणाला आवताडे यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे.

त्या दृष्टीने या शासकीय विभागाकडे  मागणी करून ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांसाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून आणला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

मंगळवेढा तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे

कचरेवाडी येथील शिंदे – गडदे वस्ती ते डोंगरगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, हिवरगांव येथील हिवरगांव ते कोळेकर, शिवाजी फटे वस्ती मुरमीकरण व खडीकरण ५ लाख, कचरेवाडी ते पाटखळ ते सरवळे वस्ती मुरमीकरण व खडीकरण करणे ७ लाख,

अकोला ते शेजाळ वस्ती ते शिवार (सातकी) रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, जित्ती येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे ५ लाख, नंदुर येथील मलिकशहा दर्गा कट्टा सुशोभिकरण करणे ५ लाख, फटेवाडी येथील महिला बालकल्याण अंगणवाडी वॉल कंपाउंड करणे ३ लाख,

उचेठाण येथील उचेठाण ते स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ७ लाख, कागष्ट येथील गाव अंतर्गत कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, ढवळस येथे गट क्रमांक २८९ /२ या गटातील फुले – शाहू – आंबेडकर या गायरान दलित वस्तीपर्यंत नदीवरून पाईपलाईन करून वस्तीमध्ये पाण्याची टाकी बसवून पाण्याची सोय करणे ५ लाख,

माळेवाडी येथील जि. प. शाळेस वॉल कंपाउंड बांधणे ५ लाख, मल्लेवाडी (शरदनगर) जि. प. शाळा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, मरवडे येथील मरवडे ते मुंढेवाडी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, मारोळी येथील पुकळे वस्ती ते करेवस्ती रस्ता खडीकरण करणे ३ लाख,

सोड्डी येथील सोड्डी ते कोकणगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, बालाजी नगर येथील दुर्गादेवी मंदिर येथे सामाजिक सभागृबांधणे ८ लाख, रहाटेवाडी येथील मारुती दत्तू पवार घर ते विकास पवार घर रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

रहाटेवाडी येथील सतीश पाटील घर ते अनिल पितांबर पवार घर रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, दामाजी नगर येथील डोके हॉस्पिटल ते महादेव आगतराव आवताडे घर रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, मौजे देगाव ते मंगळवेढा रस्ता देगांव हद्दीतील पेट्रोल पंपापासून पश्चिमकडेल दादा पाटील सर ते जिजाबा माळी वस्ती पर्यंत जाणारा कॅनॉल पट्टी रस्ता मुरमीकरणे ५ लाख,

तामदर्डी ते अरबळी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, दामाजी नगर येथील लक्ष्मण जगताप प्लॉट अंतर्गत २०० मीटर रस्ता तयार करणे १० लाख, हिवरगाव येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, लोणार येथील वाघमोडे वस्ती ते हुन्नुर लगत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

शेलेवाडी येथील शेलेवाडी ते जुना आंधळगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख रुपये, कचरेवाडी येथील स्मशानभूमी ते महिपती अनुसे /कोळेकर वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, घरनिकी येथील घरनिकी ते मोरे मळा बंधारा जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

बोराळे येथील बोराळे एम. एस. ई. बी. ते अरळी हद्दीपर्यंतचा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, पाटकळ येथील पाटकळ रोड ते जाधव वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, उचेठाण येथील उचेठाण ते मुढवी शिवपर्यंत जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

ब्रह्मपुरी येथील ब्रह्मपुरी ते बठाण शिवपर्यंत जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, माचणूर येथील सुखदेव सरवदे वस्ती ते बाळासाहेब बेदरे वस्तीपर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

तांडोर येथील बाबूसिंग रजपूत वस्ती ते बाळासाहेब मळगे वस्ती पर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, आंधळगाव ते शेलेवाडी (एम. एस. सी. बी. समोरील) शिवरस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, शिरसी येथील दत्ता गायकवाड ते कुलाळ वस्तीपर्यंत मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, डोंगरगाव येथील जि. प.शाळा उन्हाळे वस्ती ते नानासाहेब उन्हाळे वस्ती पर्यंतचा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

येळगी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, भोसे येथील रामचंद्र कोपे वस्ती ते बंडू खडतरे वस्ती ( निकम वस्तीशाळा) मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

संत चोखामेळा नगर येथील मैंदर्गिकर घर रस्ता ते श्रीरंग काटे रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, तळसंगी येथील भाळवणी रोड ते दुधाळ वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, खवे येथील खवे ते मेटकरी वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख.

पंढरपूर तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे –

त. शेटफळ येथील बाबर वस्ती ते साबळे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, तनाळी येथील काशिलिंग नगर ते कॅनल रस्‍ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, तावशी येथील सरदार ओढा ते वराडदेवी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, एकलासपुर येथील एकलासपुर ते गुळ कारखाना (कासेगाव) काय करायचं रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख,

शिरगाव येथील शिरगाव ते अनवली रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, सिद्धेवाडी व कासेगाव येथील रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, कासेगाव येथील त्यामध्ये कुरे वस्ती ते दासाब मळा रस्ता  खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख,

कासेगाव येथील मायनर वस्ती ते भुसे नगर शाळा खडीकरण व मुरमीकरण करणे १० लाख, कोर्टी येथील ज्ञानू ढोपे वस्ती ते अर्जुन ढोपे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

मौजे गादेगाव येथील सिद्धनाथ भिमराव बागल नाला डीवाय २५ ते विक्रम छगन बागल वस्ती मुरमीकरण करणे १० लाख, एकलासपुर येथील शिरगाव रोड ते लाड वस्ती शाळा रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे ५ लाख, कासेगाव येथील समाधान बिरा मासाळ ते ३२डीवाय कॅनॉल ( कायर पट्टा ) रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १०लाख,

वाखरी येथील वडाची वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, गादेगाव येथील हुडेकरी वस्ती ते स्मशानभूमी रस्ता मुरमीकरण करणे १० लाख, कोर्टी येथील बुऱ्हाण शेख, माळी वस्ती ते गादेगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख,

लक्ष्मी टाकळी येथील गणपती चौक ते मोरे घर रस्ता मुरमीकरण कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, लक्ष्मी टाकळी येथील समता नगर अण्णाभाऊ साठे शाळेपाठीमागील रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख,

बोहाळी येथील बोहाळी ते जुना  गादेगाव रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, उंबरगाव येथील खंडोबा मंदिर ते बाळू चव्हाण वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख,

तावशी येथील अभिजीत शिंदे घर ते कुमार शिंदे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, तनाळी येथील कॅनॉल रस्ता ते विठ्ठल लवटे महाराज रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, कासेगाव येथील चव्हाण पूल ते मुजावर वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १०लाख,

कासेगाव येथील गंगथडे वस्ती ते जाधव वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, अनवली येथील ज्योतिबा मंदिर ते गांजाळे आणि घोडके वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, गोपाळपुर येथील मंगळवेढा पंढरपूर रोडला जोडणारा गोंदवलेकर महाराज रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख,

मुंढेवाडी येथील दत्ता मोरे वस्ती ते पांडुरंग राऊत वस्ती मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, कौठाळी येथील माणिक आप्पानाला ते हुलगे वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख,

शिरढोण येथील विठ्ठल बंडगर घर ते रामचंद्र लवटे / जगन्नाथ गाडवे घरापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, गादेगाव येथील नारायण आवताडे वस्ती संभाजी शिवाजी बागल वस्ती पर्यंत मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख.

अशा पद्धतीने पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील विविध विकासकामांना ५ कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरवात होईल अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेतील आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; नोंदणी-व्हेरिफिकेशनमध्ये चूक नको; ‘या’ तारखेपर्यंत शाळा नोंदणी करा पूर्ण…

January 12, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

January 12, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! बापाने विहिरीत ढकलून जुळ्या मुलांचा घेतला जीव; सोलापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना; पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

January 11, 2026
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठी खिंडार; प्रदेश चिटणीस सायरा शेख यांचा राजीनामा; ‘या’ पक्षाच्या उमेदवारांना देणार पाठींबा?

January 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! रोटरखाली आल्याने मंगळवेढ्यातील तरुणाचा मृत्यू; मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

January 10, 2026
Next Post
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

शेतकऱ्यांनो! दामाजी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा; 'या' विषयांवर होणार विचार-विनीमय

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा