mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

टेंशन वाढणार! शिवसेनेत परतण्याबाबत त्या नगरसेवकांनी घेतली ही भूमिका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
टेंशन वाढणार! शिवसेनेत परतण्याबाबत त्या नगरसेवकांनी घेतली ही भूमिका

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून आमदार नीलेश लंके यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे प्रवेश केला. या प्रवेशाने केवळ पारनेर तालुक्यातील राजकराण नव्हे तर थेट राज्य पातळीवरील राजकारणात त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. This is the role played by those corporators in returning to Shiv Sena

राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये प्रवेश दिलेल्या त्या नगरसेवकांना परत शिवसेनेत पाठवा असा फोन मिलिंद नार्वेकर यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हे नगरसेवक परत पाठविले जाणार का आणि राष्ट्रवादीने जर त्यांना माघारी पाठवले तर संबंधितांची माघारी जाण्याची मानसिकता आहे का, या बाबत संबंधित नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला असता त्यांनी खालीलप्रमाणे मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून आमदार लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करू, त्यासाठी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, असा पवित्रा अाता या नगरसेवकांनी घेतला आहे. – डॉ.मुद्दस्सीर सय्यद–


आम्ही शिवसेना सोडली आहे. अाता पुन्हा शिवसेनेत जाणे शक्यच नाही. जर आम्हाला शिवसेनेत परत जाण्यास सांगितले तर आम्ही आमची कैफायत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मातोश्रीवर जाऊन मांडू. आम्ही शिवसेना पक्षावर नाराज नाही, तर स्थानिक नेतृत्वावर नाराज आहोत. मुळात पक्षाच्या स्थानिक नेतत्वाच्या हुकूमशाहीमुळे आम्ही बाहेर पडलो आहेत. आमदार लंके यांनाही त्याच कारणातून पक्षातून बाहेर काढले गेले आहे. मध्यंतरी नगरपंचायतीमध्ये सत्ता बदल झाला, तो केवळ स्थानिक नेतृत्वावर असलेली नाराजी हेच कारण होते. आम्हाला स्थानिक प्रश्न महत्वाचे आहेत, ते सुटावेत ही अपेक्षा आहे. त्यासाठी पक्षबदल केला आहे. – वैशाली औटी


आम्ही अाता घेतलेला निर्णयावर ठाम आहोत. अाता वेळ पडली तर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ. मात्र, आम्ही अाता पुन्हा शिवसेनेत माघारी जाऊन प्रवेश करणार नाही. या पुढे काहीही झाले तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. या पुढील काळात आम्ही आमदार लंके यांच्यासोबतच काम करणार आहोत.- नंदा देशमाने


आम्ही सर्वांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. अाता तो निर्णय पुन्हा फिरवणे शक्य नाही. नगरसेवकपद महत्वाचे नाही तर शहरातील जनतेची कामे व शहराचा विकास महत्वाचा आहे. आम्ही स्थानिक नाराजीतून शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत. यात अाता बदल होणे शक्य नाही. या पुढील काळात काहीही झाले तरीही पुन्हा माघारी जाणे होणार नाही. आम्हाला राष्ट्रवादीसोबत राहायचंय.- नंदकुमार देशमुख


अाता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमचा पक्ष प्रवेश झाला आहे. अाता मागे कसे जाणार. हा काही किराणा माल नाही की तो मागे देता येईल. आमचे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाशी भांडण नाही तर आमचे भांडण स्थानिक नेतृत्वाशी आहे. अाता त्यांच्याबरोबर जमणे शक्य नाही. आम्हाला नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत उमेद्वारी मिळाली नाही तरी चालेल मात्र अाता पुन्हा माघार नाही.- किसन गंधाडे


आमच्यावर स्थानिक नेतृत्वने किती अन्याय केला याचा पाढा मुंबईला जाऊन पक्ष श्रेष्टींना सांगू. आमचे नगरसेवकपदाचे राजीनामेही आम्ही देण्यास तयार आहोत. मात्र, अाता माघारी जाणार नाही. आमचा स्थानिक नेतृत्वास विरोध आहे. आम्ही या पुढील काळात आमदार लंके यांच्यासोबत काम करू. त्यांच्याबरोबर राहूनच शहराचा पाणी प्रश्न सोडविणार आहोत. शहरातील इतर विकासकामे करून घेणार आहोत. त्या मुळे अता बदल शक्य नाही.

अशा प्रकारे शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या सर्वच नगरसेवकांनी अाता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, अशा प्रतिक्रिया बोलताना दिल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Mazaराजकीय

संबंधित बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! सरपंच व उपसरपंचाने स्वतःचे  मानधन दिले गावाच्या विकासासाठी; मंगळवेढ्यातील ‘या’ गावातील दोघांची सामाजिक बांधिलकी

December 29, 2025
जोडीनं अंबाबाईचं दर्शन! आर्चीशी लग्न करणार का? कृष्णराज महाडिक यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले ठरवून…

फॉर्म्युला वन रेसिंग,’ आर्ची’शी लग्नाची चर्चा अन् आता कृष्णाराज ‘या’ निवडणुकीच्या रिंगणात; महाडिकांची तिसरी पिढी मैदानात

December 29, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागणार; ‘या’ नावांची चर्चा सुरू; कोणाला संधी मिळणार?

December 23, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे; कारभारावेळी येणार अडचणी; पाच वर्षे संघर्ष बघावा लागणार; उपनगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा असेल तर…?

December 22, 2025
मंगळवेढा नगरपालिकेवर भाजप उमेदवार सुजाता जगताप व सर्व नगरसेवकांना निवडून द्या, महिलांच्या विकासासाठी एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही; लाडक्या बहिणींना आमदार चित्रा वाघ यांचे आवाहन

मंगळवेढा नगरपालिकेवर भाजप उमेदवार सुजाता जगताप व सर्व नगरसेवकांना निवडून द्या, महिलांच्या विकासासाठी एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही; लाडक्या बहिणींना आमदार चित्रा वाघ यांचे आवाहन

December 17, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! नगरपालिकेनंतर ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

December 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025
Next Post
तरुणांनो तयारीला लागा; राज्यात १० हजार पोलिसांची भरती होणार!

तरुणांनो तयारीला लागा; राज्यात १० हजार पोलिसांची भरती होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा