टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आणि पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत आज सोमवार, दि. 13 रोजी होणार आहे. गटांची आरक्षण सोडत नियोजन भवन सभागृह, सात रस्ता सोलापूर येथे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता होईल. तसेच गणांची सोडत तालुका पातळीवर होणार आहे.
आरक्षण सोडतीबाबत ग्रामीण भागात तर्कवितर्क लावले जात आहेत. आरक्षण सोडत झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा या सोडतीकडे लागल्या आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.
त्याकरिता सोडत पद्धतीने कार्यवाही करण्याकरिता विशेष सभा आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद करिता सोडत कार्यक्रम नियोजन भवन सभागृह, सात रस्ता सोलापूर या ठिकाणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवेढा तहसील कार्यालयात पंचायत समिती आरक्षित जागांचा आरक्षण सोडत
पंचायत समिती गण मंगळवेढा करिता आरक्षित जागांचा आरक्षण सोडत कार्यक्रम तहसील कार्यालय मंगळवेढा या ठिकाणी सोमवार दिनांक आज 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तरी जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी व वरील वेळेत हजर राहावे असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज