मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यावर अनेक मातब्बर नेते व पुढारी याचा हिरमोड झाला आहे तर काहींचे स्वप्न भंगले… तर काहींचे स्वप्न रंगले …

गावचा पुढारी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही याची खात्री झाली असून उत्सुकता संपुष्टात आली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील सरपंच पदासाठी 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली असून प्रांताधिकारी बी.आर माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शेख यांच्या उपस्थितीत हे आरक्षण सोडत काढण्यात आली.

2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुक्यातील 79 गावाच्या सरपंचाची आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात निश्चित करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी गटविकास अधिकारी शेख, निवासी नायब तहसीलदार शुभांगी जाधव आदीसह विविध गावातील सरपंच पदाचे इच्छुक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुक्यातील 79 गावाच्या सरपंचाची आज झालेल्या आरक्षण सोडती मध्ये 11 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी, एक जागा अनुसूचित जमातीसाठी, पुन्हा 21 जागा या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झाल्या त्यामधील 10 जागा या महिलांसाठी.

खुल्या प्रवर्गातील 46 गावांमध्ये खुला प्रवर्ग 23 आणि महिलांसाठी खुला प्रवर्गासाठी 23 असे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामध्ये अनेक जण आरक्षण सोडतीवर लक्ष ठेवून होते.

सोडती दरम्यान अनेक इच्छुकांना मनासारखे आरक्षण मिळाले नाही म्हणून आरक्षण सोडतीतून काढता पाय घेतला अनेक बड्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने इच्छुकांची गोची झाली.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीवर पडलेले सरपंच आरक्षण पाहा

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










