मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या नामांकित रतनचंद शहा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी झालेल्या मतदानात विद्यमान अध्यक्ष राहुल शहा यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
स्थापनेपासूनच बँकेवर शहा कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व अबाधित राहिले. निकालानंतर संचालकांसह कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
बँकेसाठी रविवारी मंगळवेढा, मोहोळ, सांगोला, मोडनिंब, फलटण, पंढरपूर, करकंब, नातेपुते, जवळा या मतदार केंद्रावरील २९ बूथ प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये १४ हजार ९३२ सभासदांपैकी ४७१९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
काल सकाळी ८ वाजता विरशैव मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विजय वाघमारे यांच्या अधिकाराखाली मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते.
जमीर सुतार यांना सर्वात कमी ४०३ मते मिळाली तर संतोष बुरुकुल यांना सर्वाधिक ३८६२ मध्ये मिळाली यामध्ये ५९६ मते बाद झाली. तर इतर मागासवर्गीय जागेसाठी महादेव माळी यांना सर्वाधिक ४१७९ मते पडली तर जमीर सुतार यांना २७० मते पडली.
किरण क्षीरसागर, अश्विनी शहा, गोदावरी दत्तू, उत्तम खांडेकर हे उमेदवार बिनविरोध निवडले गेले.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे
मुझफ्फर काझी ३८२७, चंदाराणी कोंडूभैरी ३८२५, राजेंद्रकुमार जाधव ३८५२, अमृतलाल पुरवत ३८२९, संतोष बुरकुल ३८६२, नागनाथ राऊत ३८४२, राहुल शहा ३८४२, विवेकानंद शहा ३८२६,
अजिम शेख ३६९४, गजानन हजारे ३६२९, जमीर सुतार ४०३, इतर मागासवर्गीय मतदार संघात महादेव माळी ४१७९, जमीर सुतार २०३ मते पडली तर १६८ मते बाद ठरली.
मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी विजय वाघमारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे, सचिन जाधव, महेश सावंत, विलास घोडके, इंद्रजित चव्हाण, अमर गोसावी, ज्ञानेश्वर भंडगे यांच्यासह ४९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. निकालानंतर विजयी उमेदवारांनी श्री संत दामाजीपंताच्या पुतळ्यास पुष्पहार करून जल्लोष केला.
दरम्यान, या निकालाचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे.
सर्व संचालक बँकेच्या प्रगतीसाठी काम करू
बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र नाहक निवडणूक लादली अशा परिस्थितीत सभासदांनी ज्या विश्वासाने आम्हाला मतदान करून निवडून दिले, त्यांच्या विश्वासास पात्र राहून सर्व संचालक बँकेच्या प्रगतीसाठी काम करू. – राहुल शहा, पॅनेल प्रमुख सहकार पॅनेल
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज