टीम मंगळवेढा टाईम्स।
चालू गळीत हंगामासाठी गाळप क्षमता वाढवली असून सुमारे साडे पाच लाख मे.टनाचे उद्दीष्ट पूर्ण केले जाणार आहे. मागील गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकर्यांना
पोळा व दिवाळीसाठी एफआरपीपेक्षा जादा हप्ता देणार असल्याचे प्रतिपादन सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी केले आहे.
खर्डी ता.पंढरपूर येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी मिल रोलरचे सोलापूरचे उद्योजक सुभाष मर्दा,
धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, चेअरमन शोभाताई काळुंगे यांचे हस्ते पूजनाचा कार्यक्रम शुक्रवार दि.29 जुलै रोजी पार पडला.
पुढे गायकवाड म्हणाल्या, गत हंगामात निर्माण झालेल्या साखरेतून सुमारे 2 लाख 65 हजार पोती साखरेची इराण व इराकला निर्यात केली आहे.
आगस्ट 2022 अखेर कारखान्यावर एक लाख लिटर क्षमतेचा डिस्टलरी प्रकल्प उभा केला जाणार आहे. तसेच कारखान्याने अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे भविष्यात कर्मचार्यांना व शेतकर्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. 2022-23 या गाळप हंगामासाठी साडे पाच लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून 10 मे.वॅट सहविजनिर्मिती प्रकल्पातून 3 कोटी युनिट विज एक्सपोर्ट होईल असे सांगितले.
सिताराम कारखान्याने शेतकर्यांना ऊस बिलाची रक्कम, तोडणी वाहतुक रक्कम तसेच कर्मचार्यांना पगार आदा करून ऊस पुरवठा शेतकरी, कर्मचारी व तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचा विश्वास संपादन केला आहे.
तसेच कारखान्याने सर्व बँकाकडील कर्जाचा हप्ता व व्याजाची रक्कम आदा केली आहे.
याप्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे, चेअरमन शोभाताई काळुंगे, कारखान्याचे संचालक महादेव देठे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संचालक सुयोग गायकवाड, अविनाश चव्हाण, प्रकाश काळुंगे, कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंत पाटील, बिभीषण ताड, सोपान तोडकर, संजय चौगुले, सुनिल पाटील,
रावसाहेब पाटील, टेक्निकल जनरल मॅनेजर सुर्यकांत पाटील, मुख्य शेती अधिकारी शिंदे, चिप केमिस्ट नागणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रशासनाधिकारी डी.एम.सुतार यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज