मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रोहिणी बनकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकासह वाखरी हद्दीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ दुचाकींसह ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत जुगार खेळताना सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवकांसह काही प्रतिष्ठीत व्यापारी रंगेहात सापडले. याप्रकरणी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील जुन्या अकलूज रोडलगत वाखरी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ त्यांनी पोलीस पथकासह छापा टाकला असता नाथाभाऊ अभंगराव यांच्या वीटभट्टीजवळ पत्राशेडमध्ये हे १० जण मन्ना नावाचा तीन पत्त्यांचा जुगार खेळताना दिसून आले.
पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, त्यांना गराडा टाकून पोलिसांनी पकडले. यामध्ये तानाजी कांबळे (वय ३६, रा. नंदेश्वर), समीर शेख (वय ३२, रा. शिवाजीनगर इसबावी), महादेव धोत्रे (वय ३८, रा. जुना कराड नाका), आकाश कौलवार (वय ४५, रा. भक्तीमार्ग, पंढरपूर),
निखील धनवडे (वय ३२, रा. इसबावी), संतोष काळे (वय ३९, रा. इसबावी), अनिल सपताळ (वय ४६, रा. शिवाजीनगर, इसबावी), शिरीष थोरात (वय ४१, रा. लिंकरोड), प्रशांत चव्हाण (वय १८, रा. भोसले चौक),
सुरज गुंड (वय ३७, रा. इसबावी) आदींचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिसांना ७ मोटारसायकली तसेच ४५ हजार २३० रूपये रोकड असा ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल सापडला.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुन्या बसस्थानकासमोरील मारूती मंदिरामागे मोकळ्या जागेत खुलेआम मटका चालत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ.अर्जुन भोसले यांना मिळाली. या ठिकाणी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.
त्यानुसार बुधवारी (दि.६) एकाच दिवशी सायंकाळी ५, ६.३० आणि ८.१५ वाजता छापे टाकण्यात आले. यावेळी मटका बुकी मालक संजय ननवरे (रा. पंढरपूर) याच्यासाठी मुंबई मेन बझार मटका चालवून लोकांकडून पैसे घेताना गणेश गायकवाड (रा. संतपेठ), जमीन तांबोळी (रा. संतपेठ) व अनिकेत आवताडे (वय २०, रा. पेनूर) अशा तिघांना रंगेहात पकडण्यात आले.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज