टीम मंगळवेढा टाईम्स ।
सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण आहोत. सध्या काही भागात पावसाने विश्रांती घेतलीय. तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय. अशात आता येत्या काळात पाऊस कसा असेल? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे पाच ते सहा दिवस हवामान कोरडं राहणार आहे. 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहील. या काळात पावसाने विश्रांती पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
कधी होणार मुसळधार पाऊस?
बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर 21 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसायला होणार आहे. 21 सप्टेंबरपासून चांगला पाऊस होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. 21 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे.
21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस होणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्ता राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहावं, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.
शेतकऱ्यांना काय सल्ला?
राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 11 दिवस धो- धो पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच सतर्क राहावं, असा सल्ला डख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
उडीद, सोयाबीन ही पीकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत. 21 तारखेनंतर जोरदार पाऊस होणार आहे. पण त्याआधी कोरडं हवामान असणार आहे. त्यामुळे काळात काढणीला आलेली पिकं काढून घ्या, असं सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. सुरुवातीचे दोन दिवस म्हणजेच 1 आणि 2 ऑक्टोबरला चांगला पाऊस होईल. त्यानंतर 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे. 5 नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केलाय.(स्रोत:TV9 Marathi)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज