आगामी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने विविध ठिकाणचे इच्छुक उमेदवार चाचपणी करत असताना पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या नीता ढमाले यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पहायला मिळत आहे.
प्रतिस्पर्धी गटात उमेदवाराची निश्चिती आणि प्रचाराच्या आघाडीवर अद्याप सामसूम असताना ढमालेंनी पश्चिम महाराष्ट्रात केलेल्या सामाजिक कार्यामुळे उत्स्फूर्तपणे त्यांच्याशी जोडले गेलेल्या कार्यकर्त्यांनी ढमालेंच्या प्रचाराला वेगात सुरुवात केली आहे.
उमेदवाराची ओळख करुन देण्यापासून ते मतदारांची नोंदणी करण्याच्या कामात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर चांगलीच आघाडी घेतली आहे. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी त्यांचा नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे.
नीता ढमाले यांचे नाव जोरकसपणे पुढे आल्याने गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूरकडे असणारे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व यंदा पुण्याला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेली पदवीधर निवडणूक ऑक्टोबरमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज