टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यातील सामाजिक उपक्रमात नेहमी कार्यरत असणाऱ्या वारी आहे. परिवार सायकल क्लबच्या वतीने मरवडे, खोमनाळ, आंधळगाव, ब्रह्मपुरी, माचणूर, कचरेवाडी, मारापूर, घरनिकी, फटेवाडी, तळसंगी, खुपसंगी, पाठखळ व मंगळवेढा शहर या गावांत पहाटे सायकलवरती जाऊन मतदान जनजागृती करण्यात आली होती.
प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वारी परिवाराच्या स्तुत्य उपक्रमास यश प्राप्त झाले आहे.
मतदान जनजागृती सायकल अभियानातून मतदारांना साद घालण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देऊन नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केले असून खऱ्या अर्थान मतदारराजा जागा झाला वारी परिवार सायकल क्लबने मतदान जनजागृती करून राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
मतदान जनजागृती केलेल्या मरवडे लोकसभा ५८.५७, विधानसभा ६९.७५, वाढलेली टक्केवारी ११.१८, खोमनाळ लोकसभा ६६.७१, विधानसभा ७२.०५, वाढलेली टक्केवारी ५.३४, ब्रह्मपुरी लोकसभा ६०.७१, विधानसभा ७६.१०, वाढलेली टक्केवारी १५.३९, माचणूर लोकसभा ६५.८४, विधानसभा ७७,०५,
वाढलेली टक्केवारी ११.२१, आंधळगाव लोकसभा ५९.२९, विधानसभा ७२.६८, वाढलेली टक्केवारी १३.३९, कचरेवाडी लोकसभा ५५.४८, विधानसभा ६७.४१, वाढलेली टक्केवारी ११.९३, घरनिकी लोकसभा ६६. ३८, विधानसभा ८१.०३, वाढलेली टक्केवारी १४.६५, मारापूर लोकसभा ६९.४१, विधानसभा ७७.०५, वाढलेली टक्केवारी ७.६४, खुपसंगी लोकसभा ५४.७४,
विधानसभा ६७.३३, वाढलेली टक्केवारी १२.५९, पाठखळ लोकसभा ६५.६८, विधानसभा ७४.६६, वाढलेली टक्केवारी ८.९८, फटेवाडी लोकसभा ६२.४७, विधानसभा ७४.८१, वाढलेली टक्केवारी १२.३४, तळसंगी लोकसभा ६२.४८, विधानसभा ७४.०५, वाढलेली टक्केवारी ११.५७,
मंगळवेढा लोकसभा ५०.५०, विधानसभा ६०.३३, वाढलेली टक्केवारी ०९.८३ आदी गावांतील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यशस्वी केलेल्या उपक्रमाबद्दल वारी परिवार सायकल क्लबचे तहसीलदार मदन जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने कौतुक करून आभार मानले.
यांचे झाले मार्गदर्शन
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या आवाहनानुसार निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे, सहायक निवडणूक निर्णय अधिकरी मदन जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकरी डॉ.चरणकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वारी परिवाराने हा उपक्रम पार पाडला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज