टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील इतर १० ठिकाणी देखील नवीन ठाण्यांचा प्रस्ताव आहे. तसेच वाहतूक शाखेच्या पाच पोलिस ठाण्यांचाही प्रस्ताव आहे. सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांची हद्द १९९२ रोजी स्वतंत्र झाली.
३२ वर्षांत सोलापूर शहर- जिल्ह्याचा विस्तार झाला, लोकसंख्याही वाढली, मात्र पोलिस ठाण्यांची संख्या व पोलिस मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढले नाही. गुन्हेगारी वाढली, अशावेळी नागरिकांना तक्रार देण्यासाठी काही किलोमीटर ये-जा करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आकृतिबंध मंजूर केल्यानंतर त्यानुसार आता नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव मागविले जात आहेत. सोलापूर ग्रामीणमध्ये सध्या २५ पोलिस ठाणी असून त्यात आणखी ११ पोलिस ठाण्यांची भविष्यात भर पडणार आहे.
तब्बल ३२ वर्षांनंतर ग्रामीण पोलिसांना वाढीव पोलिस ठाणी व त्या प्रमाणात वाढीव मनुष्यबळ मिळेल आणि त्यामुळे गुन्हेगारीवरील नियंत्रणास मोठा लाभ होईल, असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
‘या’ ११ नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव
मंगळवेढ्याअंतर्गत नंदेश्वर, मोहोळ पोलिस ठाण्याअंतर्गत शेटफळ, करमाळ्याअंतर्गत जेऊर व जिंती, सांगोला पोलिस ठाण्याअंतर्गत हतीद व महूद, अक्कलकोट दक्षिणअंतर्गत करजगी, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याअंतर्गत शिरवळ, वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत रे नगर,
अकलूजअंतर्गत श्रीपूर व सोलापूर तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत चिंचोली एमआयडीसी अशा ११ ठिकाणी नवीन पोलिस ठाणी अपेक्षित आहेत. त्यानुसार ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे.
वाहतूकची ५ नवीन ठाणी
रस्ते अपघातात सोलापूर शहर- जिल्हा पहिल्या टॉपटेन जिल्ह्यात नेहमीच आहे. अपघात कमी करणे, बेशिस्त वाहनचालकांना कारवाईच्या माध्यमातून स्वयंशिस्त लावण्यासाठी ग्रामीणमध्ये वाहतूक शाखेची पाच पोलिस ठाणी वाढणार आहेत.
त्यात मोहोळ शहर, बार्शी शहर, अक्कलकोट उत्तर, पंढरपूर शहर, अकलूज शहर या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नवीन ठाणी व्हावीत, असा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी गृह विभागाला पाठविला आहे.(स्रोत:सकाळ)
गुन्हेगारी व अपघात नियंत्रणास होईल मोठी मदत
सोलापूर ग्रामीणमध्ये काही वाढीव पोलिस ठाण्यांची गरज असून त्यानुसार शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. अपघातांची संख्या वाढल्याने वाहतूक शाखेचीही पोलिस ठाणी वाढविण्याचा प्रस्ताव आहे.
पोलिस ठाण्यांची संख्या वाढल्यानंतर निश्चितपणे गुन्हेगारीवर नियंत्रण शक्य होईल आणि अपघात देखील कमी होण्यास मदत होईल.- प्रितम यावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज